शिवसैनिक सुमंत रुईकरांच्या घराचं स्वप्न अखेर पूर्ण; बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त एकनाथ शिंदेनी घराचं केलं भूमिपूजन

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठीच्या मणक्याची शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर त्यांना लवकर बरं वाटावं तसेच त्यांना दीर्घायुष्य मिळावं यासाठी बीड जिल्ह्यातील कट्टर शिवसैनिक सुमंत रुईकर यांनी पायी तिरुपती बालाजीला जाण्याचा संकल्प केला होता. त्यानुसार त्यांनी पायी चालायला सुरुवात देखील केली. मात्र रस्त्यात अचानक त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. 26 डिसेंबर रोजी कर्नाटकमधील रायचूर येथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

    बीड : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दीर्घायुष्य मिळावं यासाठी बीड येथून तिरुपती बालाजीला पायी चालत जात असताना अचानक निधन झालेले कट्टर शिवसैनिक सुमंत रुईकर यांच घर बांधून देण्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी आश्वासन दिले होते. आज अखेर मंत्री एकनाथ शिंदे यांनी शब्द पाळलाय. दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त रुईकर यांच्या घराचे भूमीपूजन करण्यात आलं आहे.

    या भूमीपूजन कार्यक्रमाला मंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑनलाइन उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. तर यापुढील पूर्ण जबाबदारी मंत्री एकनाथ शिंदे यांचे सहकारी असणारे बाजीराव चव्हाण यांच्यावर देण्यात आलीय. यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. सुमंत रुईकर यांच्या पत्नी कीर्ती रुईकर यांनी मंत्री शिंदे यांचे आभार मानले. यावेळी रुईकर कुटुंब भावुक झाले होते. त्यांच्या पश्चात त्यांचे सम्पूर्ण कुटुंब निराधार झाले होते. ही बातमी समजल्यावर शिंदे यांनी त्यांच्या कुटुंबीयांना तातडीने मदत पाठवली होती. तसेच, ही मदत दिल्यावर फोन करून त्यांची विचारपूस देखील केली होती. मात्र, त्यानंतर आज एक पाऊल पुढे जाऊन त्यांनी सुमंत रुईकर यांचं अर्धवट राहिलेलं स्वतःच्या घराचं स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने पहिलं पाऊल टाकलं. आज रुईकर यांच्या नवीन घराचं भूमिपूजन बीड येथे पार पडले.

    read_also content=”बघा..भारतीय नौदलाच्या सैनिकांचं संगीत प्रेम! परेडच्या रिहर्सलमध्ये चित्रपटाचं गाणं वाजवून वेधलं सगळयांच लक्ष~https://www.navarashtra.com/state/indian-navy-soldiers-play-bollywood-music-in-the-rehearsal-of-the-parade-nrps-226699/”]