धक्कादायक – अल्पवयीन मुलीवर सहा महिन्यात चारशेहून अधिक नराधमांनी केले अत्याचार; अत्याचार करणाऱ्यांमध्ये एका पोलिसाचाही सहभाग

सोळा वर्षांच्या (अल्पवयीन) मुलीवर(Minor Girl Raped By More Than 400 Persons In 6 Months) सहा महिन्यात सहाशेहून अधिक व्यक्तींनी अत्याचार झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे.

    बीड : राज्यात बाल लैंगिक अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. अशीच अंगावर शहारे आनणारी घटना बीडमधून समोर आली आहे. चक्क सोळा वर्षांच्या (अल्पवयीन) मुलीवर(Minor Girl Raped By More Than 400 Persons In 6 Months) सहा महिन्यात सहाशेहून अधिक व्यक्तींनी अत्याचार झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे.

    संबंधित अत्याचार झालेल्या अल्पवयीन मुलीचे अनेकांनी अत्यंत क्रूरतेने शोषण केलेले आहे. विशेष म्हणजे सहा महिन्यात चारशेहून अधिक व्यक्तींनी अत्याचार केलेला आहे. यात एका पोलीस कर्मचाऱ्याचादेखील समावेश असून संबंधित अल्पवयीन मुलगी वीस आठवड्यांची गर्भवती आहे. तिला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

    सामाजिक कार्यकर्ते तथा बालकल्याण समितीचे सदस्य तत्वशील कांबळे यांच्याकडे दोन दिवसांपूर्वी एक तक्रार आली. या तक्रारीवरून केलेल्या तपासात गंभीर बाब समोर आली आहे. बीड जिल्ह्यातील कुंबेफळ थेथील एका सोळा वर्षाच्या मुलीची ट्रॅझेडी अक्षरश: अंगावर शहारे आणणारी आहे. लहान असतानाच आईचे छत्र हारवले. सात-आठ महिन्यांपूर्वी वडिलांनी अल्पवयातच लग्न लावून दिले. सासरी नवरा सांभाळत नसल्याने ती अल्पवयीन मुलगी वडिलांकडे राहायला आली. मात्र वडिलांनी देखील तिला सांभाळण्यासाठी नकार दिला. अशा परिस्थितीत त्या मुलीला अंबाजोगाई येथील बसस्थानकावर भीक मागून स्वत:चा उदरनिर्वाह करावा लागला. याच दरम्यान तिला अत्यंत वाईट घटनांना सामोरे जावे लागले असल्याचे संबंधित अल्पवयीन मुलीने बालकल्याण अधिकारी यांना दिलेल्या जबाबात सांगितले आहे.

    या प्रकरणामध्ये बीडच्या आंबेजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून चार आरोपींना अटक करण्यात आलीय. बलात्कार आणि बालविवाहाच्या कलमानुसार गुन्हा दाखल झाला असून महिला पोलीस अधिकारी या प्रकरणाचा तपास करत आहेत. याबाबतची माहिती बीडचे पोलीस अधीक्षक आर राजा स्वामी यांनी दिली आहे.