ST Bus Workers Strike; Lollipop agitation of ST workers in Beed

बीड आगारातील एसटी कर्मचाऱ्यांनी आज लॉलीपॉप आंदोलन करून लक्षवेधले आहे. राज्य सरकारने आतापर्यंत एसटी कर्मचाऱ्यांना आश्वासने देऊन लॉलीपॉप दाखवले असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केलाय. आणि याचाच निषेध म्हणून बीड मधील एसटी कर्मचाऱ्यांनी लॉलीपॉप आंदोलन केले(ST Bus Workers Strike; Lollipop agitation of ST workers in Beed).

    बीड : बीड आगारातील एसटी कर्मचाऱ्यांनी आज लॉलीपॉप आंदोलन करून लक्षवेधले आहे. राज्य सरकारने आतापर्यंत एसटी कर्मचाऱ्यांना आश्वासने देऊन लॉलीपॉप दाखवले असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केलाय. आणि याचाच निषेध म्हणून बीड मधील एसटी कर्मचाऱ्यांनी लॉलीपॉप आंदोलन केले(ST Bus Workers Strike; Lollipop agitation of ST workers in Beed).

    बीड आगारात सुरू असलेल्या आंदोलनाचा आजचा ३८ वा दिवस आहे. या आंदोलना दरम्यान जवळपास ५५० हून अधिक कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आलीय. असे असताना देखील कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत.

    तर, दुसरीकडे परिवहन मंत्री अनिल परब यांनी आवाहन करून देखील सोमवारपासून कर्मचारी कामावर रुजू होणार नाहीत. आतापर्यंत राज्य सरकारने केवळ एसटी कर्मचाऱ्यांना लॉलीपॉप दाखवले आहे. त्यामुळे राज्य सरकारचा निषेध म्हणून कर्मचाऱ्यांनी लॉलीपॉप दाखवून आंदोलन केले आहे.