बारा दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे काम बंद;  बीड आगाराला एक कोटी वीस लाखांचा भुर्दंड

एसटीच्या शासकीय विलीनीकरणासह इतर मागण्यांसाठी कर्मचारी 9 दिवसांपासून कामबंद आंदोलन करत आहेत. मागील 8 दिवसांपासून कर्मचारी संघटना आणि शिष्टमंडळाच्या परिवहन मंत्र्यांशी चर्चेच्या फेऱ्या सुरु आहेत. पण अजूनही तोडगा न निघाल्यानं कर्मचारी आंदोलनावर ठाम आहेत. मात्र, आता कारवाईच्या भीतीने काही कर्मचारी कामावर परतायला लागले आहेत. रविवारी आणखी ८२१ कर्मचारी कामावर हजर झाले असून ६० मार्गांवर ७९ बसेस धावल्याचे एसटी महामंडळाने म्हटले आहे.

    एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी, बीड आगारात एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. आज या आंदोलनाचा बारावा दिवस, दरम्यान मागील बारा दिवसांपासून एसटी वाहतूक ठप्प असल्याने एसटी महामंडळाला लाखोंचा आर्थिक भुर्दंड देखील बसला आहे.

    बीड जिल्ह्यात एकूण आठ एसटी आगार आहेत. बीड आगारातून दररोज दोनशे एसटीच्या फेऱ्या होत असतात, परंतु मागील बारा दिवसांपासून काम बंद आंदोलन सुरू असल्याने आतापर्यंत एकूण 2400 फेऱ्या रद्द झाल्या आहेत. परिणामी दिवसाला दहा लाख रुपये उत्पन्न प्रमाणे एकट्या बीड आगाराचे एक कोटी वीस लाख रुपये नुकसान झाले आहे. बीड जिल्ह्यातील बीड आगार हे मध्यवर्ती बस स्थानक असून या ठिकाणी दररोज जवळपास 13 हजार प्रवासी प्रवास करत असतात, ऐन दिवाळीच्या दिवशी संप पुकारल्याने एसटीला याहून अधिकचा भुर्दंड सहन करावा लागला अशी माहिती आगार व्यवस्थापकांनी दिली आहे.

    दरम्यान, एसटीच्या शासकीय विलीनीकरणासह इतर मागण्यांसाठी कर्मचारी 9 दिवसांपासून कामबंद आंदोलन करत आहेत. मागील 8 दिवसांपासून कर्मचारी संघटना आणि शिष्टमंडळाच्या परिवहन मंत्र्यांशी चर्चेच्या फेऱ्या सुरु आहेत. पण अजूनही तोडगा न निघाल्यानं कर्मचारी आंदोलनावर ठाम आहेत. मात्र, आता कारवाईच्या भीतीने काही कर्मचारी कामावर परतायला लागले आहेत. रविवारी आणखी ८२१ कर्मचारी कामावर हजर झाले असून ६० मार्गांवर ७९ बसेस धावल्याचे एसटी महामंडळाने म्हटले आहे.