खाजगी ट्रॅव्हल्स चालकांकडून प्रवाशांची पिळवणूक; अव्वाच्या सव्वा भाडे वसूल

  बीड: एसटी कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन (ST strike) सुरू आहे आणि याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून खाजगी वाहनचालकांना प्रवासी वाहतूकतीची मुभा देण्यात आलीय. मात्र राज्य सरकारच्या या आदेशानंतर खाजगी वाहनचालकांना रान मोकळे झाल्याचं पहायला मिळत आहे.

  बीड जिल्ह्यात तीन तारखेच्या मध्यरात्री पासून एसटी कर्मचाऱ्यांनी काम बंदचं हत्यार उपसले आहे. परिणामी चाकरमान्यांची मोठी हेळसांड होते आहे. अनेक प्रवासी एसटी स्थानकावरच अडकून पडलेत याच प्रवाशांची पिळवणूक सध्या खाजगी वाहतूक दारांकडून होत असल्याचं दिसून येतंय. बीडमध्ये खाजगी ट्रॅव्हल्स चालकांकडून दुप्पट ते तिप्पट दर आकारणी केली जातेय.

  ट्रॅव्हल्स चालकांकडून वसूल केले जाणारे दर

  बीड, परळी – मुंबई – 2500
  -बीड, परळी – पुणे – 1400
  -बीड – औरंगाबाद – 300