जलसंपदामंञी जयंत पाटलांच्या स्वागताची परळी नगरीत जोरदार तयारी; जागोजागी स्वगताचे लागले बॅनर

राज्याचे जलसंपदा मंञी तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे सामाजिक न्याय,विशेष सहाय्यमंञी धनंजय मुंडे यांच्या परळी विधानसभा मतदार संघाच्या आढावा बैठकीसाठी उद्या 27 सप्टेंबर रोजी सायंकाळी परळी शहरात येत असुन त्यांच्या स्वागतासाठी परळी शहरात प्रमुख रस्त्यावर स्वागत कमानी,स्वागत बॅनर ,मोठमोठी कटआउट उभारुन जोरदार तयारी करण्यात आली आहे.

    बीड : राज्याचे जलसंपदा मंञी तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे सामाजिक न्याय,विशेष सहाय्यमंञी धनंजय मुंडे यांच्या परळी विधानसभा मतदार संघाच्या आढावा बैठकीसाठी उद्या 27 सप्टेंबर रोजी सायंकाळी परळी शहरात येत असुन त्यांच्या स्वागतासाठी परळी शहरात प्रमुख रस्त्यावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार,उपमुख्यमंञी अजित पवार,खा.सुप्रियाताई सुळे व प्रदेशाध्यक्ष ना.जयंत पाटिल व स्वागत अध्यक्ष धनंजय मुंडे यांचे फोटो असलेल्या स्वागत कमानी,स्वागत बॅनर ,मोठमोठी कटआउट उभारुन जोरदार तयारी करण्यात आली आहे.

    संपूर्ण शहरात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ध्वज फडकत आहेत यामुळे शहर राष्ट्रवादीमय दिसुन येत आहे. मंत्री जयंत पाटील यांचे सोमवारी सायंकाळी 7 वाजता परळी शहरात आगमन होत असल्याचे सांगण्यात आले आहे.

    परळी येथील हालगे गार्डन येथे परळी विधानसभा मतदार संघातील पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या सोबत आढावा बैठक घेणार आहेत. या बैठकीला मतदार संघातील सर्व कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याचे बोलले जात आहे तर दुसऱ्यादिवशी मंत्री जयंत पाटील बीड जिल्ह्यात मतदार संघाची आढावा बैढक घेणार आहेत.