एफआरपी प्रमाणे ऊस बिल न देणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करा; शेकापची साखर आयुक्तांकडे मागणी

कारखानदार कमी उतारा दाखवून शेतक-यांना कमी देयके देत आहेत. त्यामुळे १४ दिवसांत शेतक-यांना एफ आर पी पेक्षा कमी भाव देवून देयकाचे पैसे अदा न करणा-या बीडसह मराठवाड्यातील कारखान्यांची चौकशी करून दहा दिवसांत त्या संबंधित दोषी कारखाना व्यवस्थापनवर कारवाई करावी. अन्यथा साखर आयुक्त कार्यालयासमोर शेकापच्या वतीने आंदोलन करण्यात येईल. असा इशारा शेकापने दिला आहे.

    बीड : गळीत हंगाम २०२० – २१ मध्ये गाळप झालेल्या ऊसाचे देयक १४ दिवसात देणे बंधनकारक असताना ६० – ७० दिवस लोटुन गेले तरी बीडसह मराठवाड्यातील कारखान्यांनी ऊस बील शेतकऱ्यांना दिले नाही. पेरणीच्या तोंडावर कोरोनाच्या काळात शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांचे ऊसाचे बील चौदा दिवसाच्या आत एफ आर पी ( FRP ) प्रमाणे न देणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करण्याची मागणी शेतकरी कामगार पक्षाचे युवा नेते भाई मोहन गुंड यांनी साखर आयुक्ताकडे केली आहे.

    शेकापच्या वतीने आंदोलन

    बीडसह मराठवाड्यातील कारखान्यांनी पहिला ऊसाचा हाप्ता आपल्या सोयीनुसार शेतकऱ्यांना जमेल तसा वाटप केला आहे बीड जिल्ह्यामध्ये तेराशे, अठराशे, दोन हजार या पेक्षा कमी अधीक पहीला हप्ता वाटप केला आहे. हीच परिस्थिती मराठवाड्यातील औरंगाबाद, उस्मानाबाद, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली कारखान्याची आहे.

    याबाबत साखर आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कारखानदार कमी उतारा दाखवून शेतक-यांना कमी देयके देत आहेत. त्यामुळे १४ दिवसांत शेतक-यांना एफ आर पी पेक्षा कमी भाव देवून देयकाचे पैसे अदा न करणा-या बीडसह मराठवाड्यातील कारखान्यांची चौकशी करून दहा दिवसांत त्या संबंधित दोषी कारखाना व्यवस्थापनवर कारवाई करावी. अन्यथा साखर आयुक्त कार्यालयासमोर शेकापच्या वतीने आंदोलन करण्यात येईल. असा इशारा शेकापने दिला आहे.