शेलगाव बंधाऱ्याच्या पाण्यावर तरंगताना आढळला तरुणाचा मृतदेह

बीडच्या शेलगाव परिसरातील बंधाऱ्याच्या पाण्यावर, एका तरुणाचा मृतदेह तरंगताना आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे. सदरील तरुणाचा मृतदेह हा पाण्याचा प्रवाहात वाहून आला असल्याची प्राथमीक माहिती असून पुढील तपास माजलगाव ग्रामीण पोलीसांसह तलवाडा पोलीस करत आहेत.

    बीड : बीडच्या शेलगाव परिसरातील बंधाऱ्याच्या पाण्यावर, एका तरुणाचा मृतदेह तरंगताना आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे. तर हा मृतदेह तरंगतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल झालाय.

    बीडच्या गेवराई व माजलगाव तालुक्याच्या हद्दीवर असणाऱ्या, शिवणगाव, शेलगाव परीसरातील बंधाऱ्यात, एक वाहुन आलेल्या तरुणाचा मृतदेह आढळुन आला आहे. हा मृतदेह माजलगाव व तलवाडा पोलिसांनी पाण्याबाहेर काढला असून त्याची ओळख पटली आहे.

    दरम्यान महेश जालिंदर कासार वय 18 रा. मनुबाई जवळा ता. गेवराई असं त्या तरुणाचं नाव आहे. सदरील तरुणाचा मृतदेह हा पाण्याचा प्रवाहात वाहून आला असल्याची प्राथमीक माहिती असून पुढील तपास माजलगाव ग्रामीण पोलीसांसह तलवाडा पोलीस करत आहेत.