नदीच्या प्रवाहात वाहून जाणाऱ्या १० वर्षाच्या मुलाला वाचवण्यासाठी तरुणीने केले असे की ….. video viral

मुलगा पाण्यात अडकला. पाण्यात अडकल्याने त्याला बाहेर येता येत नव्हत म्हणून त्यांने त्याच्या आई- वडिलांनी आरडा ओरडा करण्यास सुरुवात केली. पण पाण्याचा प्रवाह जोरात होता तसेच खोली किती आहे याचा अंदाज नसल्याने वाचवण्यासाठी कोणीही पुढे येत नव्हते.

    बीड: नदीच्या प्रवाहात अडकलेलया १० वर्षाच्या मुलाला तरुणीने धाडस दाखवत बाहेर काढलयाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तरुणीने धाडस दाखवत मुलाला बाहेर काढण्यासाठी पुढाकार घेतला. स्वतःचा जीव धोक्यात घालत मुलाचा जीव वाचवला आहे. मुलाला वाचवण्यासाठी तरुणीने ओढणीला ओढणी बांधत त्याचा दोर तयार केला. मात्र ओढणीला पकडता येत नसल्याने तरुणीने सस्वतः पाण्यात उतरत लोकांच्या मदतीने मानवी साखळी निर्माण केली व मुलाला पाण्यातून बाहेर केले. तरुणीने दाखवलेल्या या धाडसाचे सर्वत्र कटुक होत आहे.

    पाण्यात बुडत असलेला १० वर्षीय मुलगा मुलगा आपल्या आई-वडिलांसोबत आद्यकवी मुकुंदराजस्वामी मंदिर, बुट्टेनाथ डोंगर परिसरात हा मुलगा आला होता. या दरम्यान तो नदीच्या पत्रात उतरला. सदर मुलाला पाण्याचा अंदाज आला नसल्याने तो पुढे पुढे जात होता. मात्र पाण्याचा प्रवाह वाढत असल्याने मुलगा पाण्यात अडकला. पाण्यात अडकल्याने त्याला बाहेर येता येत नव्हत म्हणून त्यांने त्याच्या आई- वडिलांनी आरडा ओरडा करण्यास सुरुवात केली. पण पाण्याचा प्रवाह जोरात होता तसेच खोली किती आहे याचा अंदाज नसल्याने वाचवण्यासाठी कोणीही पुढे येत नव्हते. तेव्हा त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या सुलभा सोळंके या युवतीने प्रसंगावधान बाळगुन स्वतः पाण्यात उतरली. या तरुणीने शक्कल लढवली आणि आपल्या इतर मैत्रिणींच्या ओढण्या एकत्र केल्या आणि त्यांचा एक दोर बनवला. यानंतर या दोराच्या मदतीने आणि इतरांच्या मदतीने त्या बालकाचे प्राण वाचविले. हा प्रकार आज दुपारी वाण नदीच्या पात्रात घडला आहे.