12 डिसेंबरला ऊसतोड कामगारांशी संवाद साधणार : पंकजा मुंडे

 23, 24, 25 तारखेला मुंबई, नवी मुंबई आणि पुण्याला आहे. नंतर 29, 30, 31 तारखेला नाशिकच्या दौऱ्यावर आहे. 12 डिसेंबरला ऊसाच्या फडात जाऊन ऊसतोड कामगारांच्यासोबत मी गावागावात जाऊन संवाद साधणार आहे. धनंजय मुंडेंवर घणाघात कोरोना होता, लोकांना कोरोनाच्या संकटात औषध, बेड मिळत नव्हते.

    बीड : सावरगाव घाट येथील भगवान भक्तीगडावर (Bhagwan Bhaktigad) पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या दसरा मेळाव्याला (Dussehra Melava) सुरूवात झाली. सुरुवातीला खासदार प्रीतम मुंडे यांच्या भाषणाला सुरुवात झाली. हा मेळावा कुठल्याही पक्षाचा मेळावा नाहीये असं सर्वप्रथम खासदार प्रीतम मुंडे यांनी म्हटलं. तसेच आपला आवाज हा केवळ बीड जिल्ह्यापुरता नाही तर दिल्लीपर्यंत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

    23, 24, 25 तारखेला मुंबई, नवी मुंबई आणि पुण्याला आहे. नंतर 29, 30, 31 तारखेला नाशिकच्या दौऱ्यावर आहे. 12 डिसेंबरला ऊसाच्या फडात जाऊन ऊसतोड कामगारांच्यासोबत मी गावागावात जाऊन संवाद साधणार आहे. धनंजय मुंडेंवर घणाघात कोरोना होता, लोकांना कोरोनाच्या संकटात औषध, बेड मिळत नव्हते.

    अशी नागरिकांची अवस्था असताना मी दौरे करायला पाहिजे होते का? मी दौरे करुन तुमचं आरोग्य धोक्यात टाकायचं होतं का? तमुची काळजी वाटली म्हणून घरात बसली नाही तर कोविड सेंटर सुरू केलं. कोरोना संकटात नागरिकांना बेड, औषधे उपलब्ध करुन दिली.

    अतिवृष्टी झाली तेव्हा दौरा केला आणि दसऱ्याच्या आधी पॅकेज जाहीर करण्याचं म्हटलं, केलं की नाही दसऱ्यापूर्वी पॅकेज जाहीर. केवळ पॅकेज जाहीर करुन चालणार नाही तर शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले पाहिजेत. शेतकऱ्यांना मदत मिळाली का? असा प्रश्न देखील पंकजा मुंडे यांनी उपस्थित केला.