दरेकर, फडणवीसांचा मराठवाडा दौरा, पंकजा मुंडे आजारी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व प्रविण दरेकर आज मराठवाडा दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन फडणवीस नुकानीची पाहाणी करत आहेत. मात्र, याच वेळी मराठवाड्याचे नेते असलेल्या गोपीनाथ मुंडे यांची कन्या व राज्याच्या माजी मंत्री भाजप नेत्या पंकजा मुंडे मात्र या दौऱ्यात उपस्थित नाहीयत.

    मराठवाड्यासह राज्यातील इतर भागात पावसानं अक्षरश: थैमान घातलं. परतीच्या पावसाच्या या अतिवृष्टीमुळे शेती पिकांचं प्रचंड नुकसान झालं आहे. याच परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी विधानसभा व विधान परिषद या दोन्ही सभागृहाचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व प्रविण दरेकर आज मराठवाडा दौऱ्यावर आहे. या दौऱ्याची सुरुवात वाशिम जिल्ह्यातून करण्यात आली आहे.

    या दौऱ्यात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन फडणवीस नुकानीची पाहाणी करत आहेत. मात्र, याच वेळी मराठवाड्याचे नेते असलेल्या गोपीनाथ मुंडे यांची कन्या व राज्याच्या माजी मंत्री भाजप नेत्या पंकजा मुंडे मात्र या दौऱ्यात उपस्थित नाहीयत.

    याबाबत पंकजा यांनी स्वत: ट्वीट करुन आजारी असल्याची माहिती दिली आहे. फडणवीसांकडून दौऱ्याची घोषणा आणि पंकजा मुंडे आजारी पडणं यामुळे आता राजकीय चर्चेला सुरुवात झाली आहे.

    विधानसभा निवडणुकीपासून देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांच्यात सर्वकाही आलबेल नसल्याचं पाहायला मिळत आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारादरम्यान ही बाब पुन्हा एकदा प्रकर्षानं दिसून आली. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करणार असल्याची घोषणा केली आहे. वाशिममधून आपण तीन दिवसीय पाहणी दौऱ्याला सुरुवात करणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.