प्रतिकात्मक फोटो (Symbolic Photo)
प्रतिकात्मक फोटो (Symbolic Photo)

काही दिवसांपूर्वीच नाशिकमध्ये फटाके उडवताना शौर्य लोखंडे हा मुलगा भाजला होता. त्याच्या छाती आणि पाठीचा भाग फटाक्यांमुळे जळला. त्यामुळे कृपया दिवाळीत मुलांवर लक्ष ठेवा आणि तुमच्या मुलांची काळजी घ्या.

    हिंगोली (Hingoli) : दिवाळीचा सण आहे. दिवाळीत फटाके फोडले जातात. (Diwali Firecrackers) मात्र, काळजी घेतली नाही तर ती तुमच्या जीवावर बेतते. अशीच एक दुर्दैवी घटना हिंगोली येथे घडली आहे. पेटता फटाका डोळ्यात शिरल्याने 9 वर्षांच्या मुलाचा डोळा निकामी झाला. ही धक्कादायक घटना गोजेगावातील घडली आहे. (Diwali – Firecrackers are dangerous, a boy’s eye failed at Hingoli)

    दिवाळी सण तोंडावर आहे. त्यामुळे फटाके फोडत असाल तर ही बातमी वाचून अंगावर काटा उभा राहिल. (Diwali Firecrackers dangerous) 9 वर्षांच्या मुलाला फटाके फोडणे मोठे महागात पडले आहे. पेटता फटाका डोळ्यात शिरल्याने साईनाथ घुगे या मुलाचा डोळा निकामी झाला आहे.

    साईनाथ मामाकडे आईबरोबर दिवाळी साजरी करायला आला होता. मामाच्या घरी फटाके फोडत असताना पेटता फटाका डोळ्यात घुसल्याने त्याचा एक डोळा निकामी झाला आहे. हिंगोलीच्या औंढा नागनाथ तालुक्यातील गोजेगावात ही धक्कदायक घटनाघडलीय.

    काही दिवसांपूर्वीच नाशिकमध्ये फटाके उडवताना शौर्य लोखंडे हा मुलगा भाजला होता. त्याच्या छाती आणि पाठीचा भाग फटाक्यांमुळे जळला. त्यामुळे कृपया दिवाळीत मुलांवर लक्ष ठेवा आणि तुमच्या मुलांची काळजी घ्या.