राज्य सरकारमधील तीनही पक्ष एकमेकांपासून संरक्षण करण्यात गुंतलेले आहेत : लक्ष्मण ढोबळे

राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये तीन पक्ष आहेत. आणि या तीनही राजकीय पक्षांना एकमेकांपासून संरक्षण हवं आहे. हे तीनही पक्ष पूर्णपणे त्यांच्या संरक्षणामध्ये गुंतलेले आहेत. असा घणाघात माजी मंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांनी राज्य सरकारवर केला आहे.

    हिंगोली : राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये तीन पक्ष आहेत. आणि या तीनही राजकीय पक्षांना एकमेकांपासून संरक्षण हवं आहे. हे तीनही पक्ष पूर्णपणे त्यांच्या संरक्षणामध्ये गुंतलेले आहेत. असा घणाघात माजी मंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांनी राज्य सरकारवर केला आहे.

    राज्यातील गरीब दुबळ्या लोकांना काही तरी द्यावं, ही भूमिका या महाविकास आघाडी सरकारमध्ये अजिबात दिसत नाही. या तीनही पक्षांना फक्त सत्तेचं कवच हवं आहे आणि त्यासाठी संरक्षण पाहिजे आहे. त्यामुळे राज्यातील सर्व आर्थिक विकास महामंडळं हि पूर्णपणे रिकामी झाली आहेत. या महामंडळाच्या तिजोरीमध्ये एक रुपयाही नाही. या सर्व आर्थिक विकास महामंडळामध्ये असलेले तब्बल चार हजार कर्मचारी हे राजकीय लोकांचे लागेबांधे असणारी लोकं आहेत. केवळ या कर्मचाऱ्यांचा पगार व्हावा, यासाठीच ही महामंडळ सुरू आहेत. असेही ते यावेळी म्हणाले.

    तसेचं राज्यातील दिनदुबळ्या लोकांनी व्यवसाय,उद्योग करावेत. राज्यातील बारा बलुतेदार लोकांचं कल्याण व्हावं. असा कुठलाही विषय या सरकारपुढे नाही. खऱ्या अर्थानं आर्थिक विकास महामंडळांची कार्यालये कुलूपबंद अवस्थेत आहेत. अशी टीका भाजपचे नेते माजी मंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांनी हिंगोली येथे केला आहे.