हिंगोली जिल्ह्याला भूकंपाचा धक्का…

    हिंगोली : हिंगोली जिल्ह्यामध्ये रात्री साडे दहा वाजताच्या सुमारास काही गावांना भूकंपाचे धक्के बसले आहेत. जिल्ह्यातील पिंपळदरी, कुरुंदा, बोल्डा, पांगरा शिंदे यासह अन्य अनेक गावांना भूकंपाचे धक्के बसले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून जिल्ह्यात भूकंपाचे धक्के जाणवत असल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.