राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा आज हिंगोली दौरा; जिल्हा प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत केली चर्चा

    हिंगोली : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी हिंगोली येथे जिल्हा प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत विविध विकास विषयक प्रश्नांवर चर्चा केली. यावेळी राज्यपालांनी मानव विकास निर्देशांक, आदिवासी विकास व वन हक्क कायदा, करोना नियंत्रण व लसीकरण, कृषी, जलसिंचन व इतर संबंधित विषयांबाबत माहिती करुन
    घेतली.