Hingoli MSEDCL disconnects power supply to about 24 villages in Sengaon taluka; Disrupted public life

विज बिल थकबाकीमुळे महावितरण कडून सेनगांव तालुक्यातील तब्बल 24 गावांचा वीज पुरवठा मागील दहा ते पंधरा दिवसापासून खंडित करण्यात आला असल्याने सर्वसामान्य नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे(Hingoli MSEDCL disconnects power supply to about 24 villages in Sengaon taluka). मात्र, जे वीज ग्राहक दर महिन्याला नियमित वीज बिल भरतात अशा नागरिकांनाही अंधाराचा सामना करावा लागत असल्याने त्यांनी महावितरणवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

    हिंगोली : विज बिल थकबाकीमुळे महावितरण कडून सेनगांव तालुक्यातील तब्बल 24 गावांचा वीज पुरवठा मागील दहा ते पंधरा दिवसापासून खंडित करण्यात आला असल्याने सर्वसामान्य नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे(Hingoli MSEDCL disconnects power supply to about 24 villages in Sengaon taluka). मात्र, जे वीज ग्राहक दर महिन्याला नियमित वीज बिल भरतात अशा नागरिकांनाही अंधाराचा सामना करावा लागत असल्याने त्यांनी महावितरणवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

    नियमित वीज भरणाऱ्यावर अन्याय न करता थकबाकीदारांची मिटर तोडून नियमित वीजबिल भरणाऱ्यांना वीज देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.तर यावर महावितरण कडून ग्राहकांनी वीज बिल भरून सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.मात्र महावितरण कडून अशा प्रकारचे पाऊल उचलले गेल्याने सर्वसामान्य नागरिकांमधून रोष व्यक्त होत आहे.