Hingoli: Ten gates of Yeldari dam opened; Warning to the villages along the entire river

धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने सध्या येलदरी धरणाचे दहा दरवाजे उघडण्यात आले आहेत. यामुळे पूर्णा नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पुराचा धोका लक्षात घेता नागरिकांनी सुरक्षित राहण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे आहे.

    हिंगोली : जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा दमदार पावसाने हजेरी लावली आहे. मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी नद्या-नाल्यांना व ओढ्यांना पूर आला आहे.

    धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने सध्या येलदरी धरणाचे दहा दरवाजे उघडण्यात आले आहेत. यामुळे पूर्णा नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पुराचा धोका लक्षात घेता नागरिकांनी सुरक्षित राहण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे आहे.

    या पावसामुळे सध्या सोयाबीन, उडीद काढणीचा हंगाम धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली असल्याने शेतकरीवर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले.