Hingoli: Whoever wins will win the prize; Lucky draw for corona vaccinators

कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा टक्का वाढविण्यासाठी हिंगोली नगरपालिकेने अनोखा उपक्रम सुरू केला आहे. कोरोना लस घ्या आणि लकी ड्रॉ च्या माध्यमातून विविध बक्षिसे जिंकण्याची संधी नगरपालिकेने उपलब्ध करून दिली आहे(Hingoli: Whoever wins will win the prize; Lucky draw for corona vaccinators).

    हिंगोली : कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा टक्का वाढविण्यासाठी हिंगोली नगरपालिकेने अनोखा उपक्रम सुरू केला आहे. कोरोना लस घ्या आणि लकी ड्रॉ च्या माध्यमातून विविध बक्षिसे जिंकण्याची संधी नगरपालिकेने उपलब्ध करून दिली आहे(Hingoli: Whoever wins will win the prize; Lucky draw for corona vaccinators).

    शहरात विविध ठिकाणी नगरपालिकेने विशेष लसीकरण केंद्र उभारून त्या ठिकाणी लकी ड्रॉ मध्ये सहभाग घेण्याचे आवाहन नगरपालिकेने केले आहे. या लकी ड्रॉ च्या बक्षीसांमध्ये टीव्ही, फ्रिज आदी वस्तूंचा समावेश आहे.

    दोन डिसेंबर पासून ही मोहिम सुरु झाली आहे.  येत्या २४ डिसेंबरपर्यंत ही मोहीम चालणार असल्याचे हिंगोली नगर परिषदचे उपमुख्याधिकारी उमेश हेंबाडे यांनी सांगीतले.