नदीत पोहण्यासाठी उडी घेतली; पाण्याचा अंदाज न आल्याने हॉकीपटूचा बुडून मृत्यू

तो कयाधु नदी पात्रात पोहण्यासाठी आजीला म्हणत होता. यानंतर १७ सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास आजीला सोबत घेत, कयाधु नदीपात्रात पोहण्यासाठी गेला होता. बुधवारी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास कयाधु नदी पात्रात पोहण्यासाठी उडी मारली.

    हिंगोली (Hingoli) : कळमनुरी तालुक्यातील (Kalamanuri taluka) नांदापूर (Nandapur) येथील मामाच्या घरी आलेल्या अकोला येथील 22 वर्षीय उदयोन्मुख हॉकीपटूचा कयाधू नदीत (Kayadhu river.) बुडून मृत्यू झाला. ही घटना 17 सप्टेंबर रोजी घडली आहे. चंदन दिलीप ठाकूर (Chandan Dilip Thakur) असे मृत खेळाडूचे नाव आहे.

    अकोला येथील उदयोन्मुख हॉकीपटू हा १५ सप्टेंबर रोजी नांदापूर येथील मामा रगदिरसिंग ठाकुर यांच्या घरी आजीसोबत आला होता. आल्यापासून तो कयाधु नदी पात्रात पोहण्यासाठी आजीला म्हणत होता. यानंतर १७ सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास आजीला सोबत घेत, कयाधु नदीपात्रात पोहण्यासाठी गेला होता. बुधवारी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास कयाधु नदी पात्रात पोहण्यासाठी उडी मारली. नदी पात्रात उडी मारल्यानंतर पाण्याचा अंदाज आला नसावा किवा नदीतील दगड लागला असावा, यामुळे तो वर आलाच नाही. नदी काठावर बसलेली आजी त्यांची वाट पाहत राहली. तो कोठेच दिसेनासा झाल्याने, आजीने घरी जाऊन त्यांच्या मामाला सांगितले.

    मामा व ग्रामस्थांच्या मदतीने कयाधु नदीपात्रात चंदनचा शोध घेण्यास सुरूवात केली. मात्र तो सापडला नाही. तेथुन २ किलोमीटर अंतरावर असलेल्या कयाधु नदीपात्रातील सोडेगाव पुलाजवळ त्यांचा मृतदेह ५ वाजण्याच्या सुमारास सापडला. मृतदेह पाण्याबाहेर काढुन ही माहिती आई -वडिलांना देण्यात आली. यानंतर चंदनचा मृतदेह शुक्रवारी रात्री अकोल्याकडे नेण्यात आला. तेथेच त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले. याप्रकरणी पोलीस ठाण्यात नोंद घेण्याची प्रक्रिया सुरू होती. या घटनेमुळे हॉकी क्षेत्राची मोठी हानी झाल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.