हिंगोली जिल्ह्यात पुन्हा एकदा जमिनीतून गूढ आवाज, नागरिकांची उडाली तारांबळ

पांगरा शिंदे या गावात मागच्या अनेक वर्षांपासून भूगर्भातून आवाज येत आहे. या आवाजाने शतक पार केले आहे. दोन ते तीन वेळा हा आवाज आल्याने सौम्य भूकंपाचा धक्का बसल्याची नोंद देखील झाली आहे. या आवाजाची पाहणी स्वारातीम विद्यापीठ येथील भूगर्भ तज्ज्ञांनी देखील केली आहे. मात्र आवाजाचे गूढ अद्याप उकलले नाही. 

    हिंगोली- हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात पांगरा शिंदे येथे भूगर्भातून आज पुन्हा एकदा आवाज आला आहे. रविवारी सकाळी ५.४७ वाजता एक व त्यानंतर लगेच दुसरा आवाज आला. या आवाजाने कोणतेही नुकसान झाले नाही. मात्र नागरिकांची तारांबळ उडाली आहे.

    वसमत तालुक्यासह कळमनुरी व औंढा

    काही गावांत देखील आवाज आले आहेत. दुसऱ्या आवाजाची तीव्रता कमी होती. पांगरा शिंदे गावासह वापटी, कुपटी, खांबाळा, खापरखेडा, सिरळी, राजवाडी आदी गावात हा आवाज आल्याचे गावकरी सांगत आहेत.