खडतर परिस्थितीवर मात करत रूपालीने केली कुस्तीत दंगल चित्रपटाची पुनरावृत्ती

वयाच्या दहाव्या वर्षी दंगल चित्रपट बघून वडिलांच्या मार्गदर्शनाखाली कुस्तीपटू होण्याचे स्वप्न उराशी बाळगून अखंड मेहनत करून गावोगावी भरणार्‍या यात्रेमधील कुस्तीची दंगल गाजवणारी रूपाली शिंदे या मुलीने कुस्ती खेळा मध्ये राज्य लेवल पर्यंत मजल मारली आहे.

    हिंगोली : सेनगांव तालुक्यातील गोंडाळा येथील इयत्ता दहाव्या वर्गात शिकणाऱ्या रूपाली शिंदे या मुलीने आपल्या जिद्द, चिकाटी व कठोर परिश्रमाच्या जोरावर मार्ग कितीही कठीण असला तरीसुद्धा परिस्थितीशी झुंज देत मर्दानी रांगडा खेळ असलेला व पुरुषांनीच नेहमी वर्चस्व गाजवत खेळल्या जाणाऱ्या खेळालाही तिलांजली देत ग्रामीण भागातील व गरीब कुटुंबातील असलेली रूपाली शिंदे हिने एक वेगळ्या प्रकारे या खेळावर आपली छाप पाडून एक प्रकारचे नाव लौकीक मिळवले आहे.

    वयाच्या दहाव्या वर्षी दंगल चित्रपट बघून वडिलांच्या मार्गदर्शनाखाली कुस्तीपटू होण्याचे स्वप्न उराशी बाळगून अखंड मेहनत करून गावोगावी भरणार्‍या यात्रेमधील कुस्तीची दंगल गाजवणारी रूपाली शिंदे या मुलीने कुस्ती खेळा मध्ये राज्य लेवल पर्यंत मजल मारली आहे. अनेक मुलं आई वडीलांच स्वप्न साकार करण्यासाठी जिवाच रानं करतात मोठमोठ्या शहरात लाखो रुपये खर्चून खेळाचे प्रशिक्षण दिले घेतात एवढे करूनही यशाची खात्री अत्यंत कमी असते पण जिद्द चिकाटी असेल तर छोट्या व दुर्गम भागात राहून कोणत्याच प्रकारचे प्रशिक्षण न घेता कुस्तीमध्ये राज्यस्तरीय पर्यंत मजल मारता येते हे दुर्गम भागातील या मुलीने दाखवून दिले.आई-वडिलांना कामात मदत करून तिचा हा संघर्ष थक्क करणारा आहे.गावातील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक रामेश्वर चोपडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली तिने तालुका,जिल्हास्तरीय,विभागीय आणि राज्यस्तरापर्यंत मजल मारली असुन भारतीय सैन्यात जाऊन देशसेवा करण्याचं तिचं स्वप्न आहे मात्र तिच्या कुस्ती स्पर्धेतील परिश्रमामुळे तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.