बीडमध्ये राष्ट्रवादीचे आमदार शिवसेनेची कामे अडवितात; शिवसेना पदाधिकाऱ्यांची थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे तक्रार

शिवसैनिकांनी आणलेले कामे स्थानिक आमदार संदीप क्षिरसागर यांनी अडवल्याने आमदार संदीप क्षिरसागर यांच्या विरोधात थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे लेखी तक्रार करण्यात आली आहे. बीड मतदारसंघात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विशेष बाब म्हणून मंजुरी दिलेले विकासकामे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी अडवली आहेत. ही अन्यायकारक वर्तवणुक आम्ही सहन करनार नाही, सदर अडवलेली कामे तात्काळ शिवसेनेला द्यावेत, अशी मागणी वजा तक्रार शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिन मुळूक यांनी शिवसेना नेत्यांकडे केली आहे(In Beed, NCP MLAs obstruct Shiv Sena's activities; Complaint of Shiv Sena office bearers directly to Chief Minister Uddhav Thackeray).

    बीड : शिवसैनिकांनी आणलेले कामे स्थानिक आमदार संदीप क्षिरसागर यांनी अडवल्याने आमदार संदीप क्षिरसागर यांच्या विरोधात थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे लेखी तक्रार करण्यात आली आहे. बीड मतदारसंघात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विशेष बाब म्हणून मंजुरी दिलेले विकासकामे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी अडवली आहेत. ही अन्यायकारक वर्तवणुक आम्ही सहन करनार नाही, सदर अडवलेली कामे तात्काळ शिवसेनेला द्यावेत, अशी मागणी वजा तक्रार शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिन मुळूक यांनी शिवसेना नेत्यांकडे केली आहे(In Beed, NCP MLAs obstruct Shiv Sena’s activities; Complaint of Shiv Sena office bearers directly to Chief Minister Uddhav Thackeray).

    अन्याय सहन करणार नसल्याचा इशारा

    बीड तालुक्यातील चऱ्हाटा आणि पालवण गावाला जोडणाऱ्या पुलांना मंजूरी मिळावी, म्हणून आमदार अंबादास दानवे यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांकडे विनंती केली होती. सदर विनंती मान्य करून विशेष बाब म्हणून फेब्रुवारी २०२२ च्या अर्थसंकल्पात या कामांना समाविष्ट करून मंजूरी देण्यात आली होती. ही कामे राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी अडवली आहेत. अधिकाऱ्यांवर दबाव तंत्राचा वापर करत आहेत. आम्ही त्यांना वारंवार विनंती करून देखील त्यांनी अडवणूक सुरू केल्याने, नाईलाने आंदोलनाच्या माध्यमातून निषेध व्यक्त करावा लागला. अन्यायकारक बाब म्हणजे आम्ही तर सहन करनार नाही, असा इशारा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

    बीडमध्ये आघाडी बिघाडीच्या वाटेवर

    सदरील कामाबाबत संबंधित यंत्रणांना आदेशित करावे, अशी मागणी शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिन मुळूक यांनी मुख्यमंत्र्यांसह शिवसेना नेत्यांकडे केली आहे. दरम्यान यामुळे बीडमध्ये महाविकास आघाडीत बिघाडी होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. या अगोदरही शिवसैनिकांनी अजित पवार यांच्या कार्यक्रमाला विरोध दर्शवून, काळे झेंडे दाखवत निषेध नोंदवला होता. त्यामुळे आता या कामाचे राजकारण पुढे काय रंग घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना काळात संजय राऊतांच्या मदतीने लोकांच्या जीवाशी खेळ मांडला. माझ्यावर हल्ला करणाऱ्या लोकांना अटक करावी. या गुंडाना पोलिस आयुक्त अमिताभ गुप्तांकडून अभय का दिले जात आहे? वाधवान प्रकरणातून ते सुटले मात्र आपल्याला जीवे मारण्याच्या प्रयत्नातील आरोपींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केल्यानंतर ते आता सुटणार नाही. महानगरपालिकेत एवढे गुंड कसे घुसले, पोलिस आयुक्तांना ते दिसत नाहीत का? त्यांना अटक का झाली नाही?

    - किरीट सोमय्या, भाजपा