मासे खाण्यावरून झाला राडा, जमीवर आपटून आणि फुकणीने वार करून 65 वर्षीय खून

मासे खाण्यावरून झालेल्या वादाचं मारहणीत पर्यवसन झालं. या मारहाणीत मारोती होनाजी नरोटे यांचा मृत्यु मृत्यू झाला तर मुलगा राजुभाऊ, पुतण्या होनाजी हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे.

    जालना : खवय्यांसाठी रविवारचा दिवस हा नॅानवेज खाणाऱ्यांसाठी पर्वणीचं असतो. पण हेचं जिभेचे चोचले पुर्ण करताना एका व्यक्तिला जीवाल मुकावं लागलं आहे. घनसावंगी तालुक्यातल्या रामटेकडी वस्ती पिंपरखेडा बुद्रुक इथं जेवणात मासे वाढले नसल्याच्या कारणावरून एका 65 वर्षीय व्यक्तिचा जमीवर आपटून आणि लोखंडी फुकणीने वार करून खून करण्यात आल्याची घटना घडली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरखेडा बुद्रुक येथील रहिवासी मारोती होनाजी नरोटे यांंनी रविवारची सुट्टी असल्यामुळे घरी मासे खाण्याचा बेत आखला होता. मारोती यांच्यासोबत त्यांचा मुलगा राजुभाऊ नरोटे, पुतण्या होनाजी नरोटे हे मासे आणून भाजी तयार करून जेवत असताना तिथे आरोपी पांडुरंग ज्ञानेदेव हांगे आला. त्यानेही मासे खाण्याती इच्छा व्यक्त केली. मात्र, मारोती यांनी मासे तिघांपुरते असल्याचं सांगत नकार दिला. यावरून आरोपी पांडुरंग याने त्यांच्यासोबत वाद घालण्यास सुरवात केली. यावेळी त्याने लोखंडी फुकणी आणि लाकडाने मारोती होनाजी नरोटे, त्यांचा मुलगा राजुभाऊ नरोटे, पुतण्या होनाजी नरोटे यांना जबर मारहाण केल. मा

    या घटनेची माहिती मिळताच सुशिला मारुती नरोटे यांच्या तक्रारीवरून आरोपी पांडुरंग ज्ञानेदेव हांगे यांच्या विरुद्ध जबर मारहाण करून खून केल्या प्रकरणी भादवी, 302,324,506 कलमानुसार गुन्हा दाखल  केला आहे.