Governor has no right to remain on post says Arjun Khotkar

भाजपचे नेते किरीट सोमय्या(Kirit somayya) यांनी जालन्यातील शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर(Arjun Khotkar) यांच्यावर रामनगर साखर कारखाना(Ramnagar Sugar Mill) खरेदी तसेच कारखान्यांच्या जमिनीत भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला होता.यानंतर आज जालन्यात ईडीच(ED Raid In Jalna) पथक दाखल झालं आहे.

    जालना: शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर(Arjun Khotkar) यांच्या यांच्या जालन्यामधील घरी सक्तवसुली संचालनायलयाने (ईडी)आज सकाळी छापा(Ed Raid In Jalna) टाकला आहे. ईडीचे पथक जालन्यात दाखल झाल्यानंतर पथकाकडून बाजार समिती कार्यालय आणि अर्जुन खोतकर कॉम्प्लेक्समध्ये जाऊन ईडीने चौकशी केल्याची माहिती समोर आली आहे.भाजपचे नेते किरीट सोमय्या(Kirit somayya) यांनी जालन्यातील शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांच्यावर रामनगर साखर कारखाना(Ramnagar Sugar Mill) खरेदी तसेच कारखान्यांच्या जमिनीत भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला होता.यानंतर आज जालन्यात ईडीच पथक दाखल झालं आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, या पथकाने रामनगर साखर कारखाना खरेदी प्रकरणी जालना बाजार समितीच्या मुख्य कार्यालयात जाऊन चौकशी केली आहे.त्यानंतर जुन्या मोंढ्यातील अर्जुन खोतकर कॉम्प्लेक्समधील कार्यालयात देखील ईडीच्या पथकाने चौकशी केल्याची माहिती समोर आली आहे. या ठिकाणी चौकशी केल्यानंतर हे पथक पुन्हा बाजार समिती कार्यालयात दाखल झाल.येथेही या पथकाने बाजार समितीमधील काही दस्तावेजाची तपासणी केल्याची माहिती आहे.

    छापा पडला तेव्हा अर्जुन खोतकर हे घरीच होते अशी माहिती समोर आली आहे. यापूर्वी खोतकरांनी सोमय्यांनी केलेले आरोप फेटाळून लावले होते. आपले काही लाखांचे शेअर्स कारखान्यात आहेत. आपण भागीदार आहोत. मालक नाही, असं खोतकर यांनी स्पष्ट केलं होतं. सकाळी साडेआठ वाजल्यापासून ईडीचं पथक खोतकरांच्या भाग्यनगर येथील बंगल्यामध्ये आहे. १२ जणांचं पथक या ठिकाणी तपासणी करत आहे. आतमधून दरवाजे बंद केले असून कोणालाही आतमध्ये प्रवेश दिला जात नाही.