राज्यात आठ कोटी नागरिकांचा पहिला डोस पूर्ण – राजेश टोपे

आरोग्य मंत्री म्हणाले की, ओमायक्राॅनचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी राज्य सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. त्यासाठी येत्या 15 ते 20 दिवसांत महाराष्ट्रात शंभर टक्के लसीकरण पूर्ण करण्याचे लक्ष आहे. कोरोनाचा नवा व्हेरिएन्ट ओमायक्राॅन हा संसर्गजन्य असला तरी तो धोरायदायक नसल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. सध्या राज्यात ओमायक्राॅनचे 54 रुग्ण असून प्रोटोकालनुसार दररोज दीड ते दोन लाख नागरिकांची टेस्टिंग केली जात आहे.

    जालना : ‘राज्यात ओमायक्राॅन वाढू नये यासाठी राज्य सरकारकडून आवश्यक ती सर्व खबरदारी घेतली जात आहे. त्यासाठी आपण दररोज दीड ते दोन लाख नागरिकांची टेस्टिंग करत आहोत’ अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. ते जालन्यात पत्रकारांशी बोलत होते.
    आरोग्य मंत्री म्हणाले की, ओमायक्राॅनचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी राज्य सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. त्यासाठी येत्या 15 ते 20 दिवसांत महाराष्ट्रात शंभर टक्के लसीकरण पूर्ण करण्याचे लक्ष आहे.
    कोरोनाचा नवा व्हेरिएन्ट ओमायक्राॅन हा संसर्गजन्य असला तरी तो धोरायदायक नसल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. सध्या राज्यात ओमायक्राॅनचे 54 रुग्ण असून प्रोटोकालनुसार दररोज दीड ते दोन लाख नागरिकांची टेस्टिंग केली जात आहे. त्याचबरोबर राज्यात आठ कोटी नागरिकांचा पहिला डोस पूर्ण झाला असून येत्या पंधरा ते वीस दिवसांत महाराष्ट्र शंभर टक्के लसीकरण होईल असं टोपे यांनी म्हंटलं आहे.
    दरम्यान, जगभरात ‘ओमायक्रॉन’ व्हॅरियंटचा धोका वाढत असताना एक चांगली बातमी समोर आली आहे. अमेरिकन औषध निर्माता मॉडेर्ना कंपनीने दावा केला आहे की, त्याचा बूस्टर डोस नेहमीच्या दोन डोसपेक्षा नवीन ओमायक्रॉन प्रकाराविरूद्ध अधिक प्रभावी आहे.
    कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की, तिच्या लसीच्या दोन डोसने ओमायक्रॉन प्रकाराविरूद्ध कमी प्रमाणात न्यूट्रलायझिंग अँटीबॉडीज तयार केले. परंतु ५० मायक्रोग्रामच्या बूस्टर डोसने वेरिएंटच्या विरूद्ध ३७ पट अधिक तटस्थ प्रतिपिंड तयार केले.