शिवसेनेत आग लावण्याचं काम माझं नाही – रावसाहेब दानवे

जालना जिल्ह्यातील पहिल्या नांदेड-हडपसर-पूणे एक्स्प्रेस किसान रेल्वेचा शुभारंभ केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या उपस्थितीत होते. या किसान रेल्वेच्या माध्यमातून जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा ३५० टन कांदा पहिल्याच फेरीत आसाममध्ये पाठवण्यात आला. त्यामुळे आता शेतकऱ्यांना कमी वाहतूक खर्च आणि कमी वेळेत शेतीमाल बाहेरील राज्यात पाठवता येणार आहे. यादृष्टीने ही किसान रेल शेतकऱ्यांच्या उत्पन्नांत वाढ होण्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. अशी प्रतिक्रीया रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली.

  जालना : ‘शिवसेनेत मी आग लावलेली नाही, ते काम माझं नाही.’ असं म्हणत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी शिवसेना नेते व मंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या आरोपांना उत्तर दिलं आहे. दानवे यांनी आमच्यात आग लावण्याचं काम करू नये असं मंत्री शिंदे यांनी म्हटलं होतं.

  एकनाथ शिंदेंना उत्तर देताना दानवे म्हणाले की, ‘शिवसेनेत मी आग लावलेली नाही, ते काम माझं नाही. शिंदे हे एक अनुभवी नेते असून मुख्यमंत्री पुन्हा आजारी पडल्यास एकनाथ शिंदे यांच्याकडे राज्याचा चार्ज दिला पाहिजे.’

  जालना जिल्ह्यातील पहिल्या नांदेड-हडपसर-पूणे एक्स्प्रेस किसान रेल्वेचा शुभारंभ केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या उपस्थितीत होते.

  या किसान रेल्वेच्या माध्यमातून जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा ३५० टन कांदा पहिल्याच फेरीत आसाममध्ये पाठवण्यात आला. त्यामुळे आता शेतकऱ्यांना कमी वाहतूक खर्च आणि कमी वेळेत शेतीमाल बाहेरील राज्यात पाठवता येणार आहे. यादृष्टीने ही किसान रेल शेतकऱ्यांच्या उत्पन्नांत वाढ होण्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. अशी प्रतिक्रीया रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली.

  बुलेट ट्रेन बाबत बोलताना दानवे म्हणाले की, ‘मुंबई-नागपूर बुलेट ट्रेन सर्व्हेक्षणाच काम सुरू असून औरंगाबादमध्ये कार्यालयाचं काम सुरू करण्याच्या विचारात आहोत. या कार्यालयासाठी आवश्यक जागा अधिग्रहण करण्याबाबत राज्य सरकारशी चर्चा केली जाईल.’

  दरम्यान, १ हजार कोटी रुपये खर्चून औरंगाबाद ते मनमाड रेल्वे मार्गाचं दुहेरीकरण करण्यात येणार असून या दुहेरी मार्गाच्या सर्वेक्षणाला सुरुवात झाली आहे. तर, दुसऱ्या टप्प्यात औरंगाबाद ते नांदेड मार्गाचं दुहेरीकरण केलं जाईल. जालना-खामगाव या रेल्वेमार्गासाठी अंतिम सर्व्ह करण्याचं काम सुरू असल्याची माहिती दानवे यांनी दिली.