Jalna: Due to unpredictable floods, ST bus fell directly into the river; 42 passengers survived

पुराच्या पाण्यात एसटी बस वाहून गेल्याची थरारक घटना जालना-परतूर (Jalna) तालुक्यातील सृष्टी गावाजवळील पुलावर घडली आहे. पुलाचा अंदाज न आल्याने बस नदीत पडली. गुरुवारी सायंकाळी साडे सात वाजेच्या सुमारास ही घटना घडली. बसमधील 42 प्रवाशांचे प्राण वाचवण्यात यश आले आहे.

    जालना : पुराच्या पाण्यात एसटी बस वाहून गेल्याची थरारक घटना जालना-परतूर (Jalna) तालुक्यातील सृष्टी गावाजवळील पुलावर घडली आहे. पुलाचा अंदाज न आल्याने बस नदीत पडली. गुरुवारी सायंकाळी साडे सात वाजेच्या सुमारास ही घटना घडली. बसमधील 42 प्रवाशांचे प्राण वाचवण्यात यश आले आहे.

    रात्रीची वेळ असल्यामुळे मदत कार्यात अडथळा येत होता. मात्र, श्रीष्ठीच्या गावकऱ्यांनी जीवाची बाजी लावून या बसमधील सुमारे 42 प्रवाशांना वाचविण्यात यश मिळवले.

    बुधवारी सायंकाळी साडे सात वाजेच्या सुमारास परतूर डेपोची बस क्रमांक एम एच 21- 22 80 ही परतुर-आष्टी कडे निघाली होती. पुलावरुन पाणी वाहत असल्यामुळे चालकाने ही बस अलीकडेच थांबविली. मात्र, काही प्रवाशांनी आणि काही उपस्थितांनी चालकाला ही बस पुलावरून घालण्यास भाग पाडले.

    बस अर्ध्या पुलावर आल्यानंतर चालकाला पुलाचा अंदाज आला नाही, आणि बस थेट नदीत खाली पडली. बसमध्ये 40 ते 45 प्रवासी होते त्यापैकी 42 प्रवासी सुखरूप बाहेर काढण्यात आले. बस वाहून जात असल्यामुळे काही गावकऱ्यांनी दोरीच्या मदतीने बसला बांधून ठेवले आणि बसच्या काचा फोडून आत मधील प्रवाशांना बाहेर काढले.

    हे होत असतानाच बस मधून एक चार- पाच वर्षाची मुलगी बाहेर पडली आणि पाण्यामध्ये वाहून जाऊ लागली या मदत कार्यामध्ये सहभागी असलेले सिद्धेश्वर अंभोरे यांनी या मुलीला पाहिले आणि पोहत जाऊन तिचा जीव वाचवला.