
महावितरण कंपनीच्या (MSEB) गलथन कारभाराचा मोठा फटका अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथील शेतकऱ्याला बसला आहे. शेतकऱ्यांचा सात एकर ऊस जळुन खाक होऊन आठ ते दहा लाखांचे नुकसान झाले आहे. यापूर्वी ही याच ठिकाणी चार वेळेस विद्युत तारामुळे ऊस पेटला होता. वारंवार घडणाऱ्या या प्रकारामुळे शेतकरी चांगलेच संतप्त झाले आहेत.
जालना : महावितरण कंपनीच्या (MSEB) गलथन कारभाराचा मोठा फटका अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथील शेतकऱ्याला बसला आहे. शेतकऱ्यांचा सात एकर ऊस जळुन खाक होऊन आठ ते दहा लाखांचे नुकसान झाले आहे. यापूर्वी ही याच ठिकाणी चार वेळेस विद्युत तारामुळे ऊस पेटला होता. वारंवार घडणाऱ्या या प्रकारामुळे शेतकरी चांगलेच संतप्त झाले आहेत.
अंतरवाली सराटी येथील शेतकरी किरण तारख यांच्या वडीगोद्री शिवारातील गट नं. १०७ मधील ७ एकर क्षेत्रावर गतवर्षी ऑगस्ट महिन्यात आडसाली ऊसाची लागवड केली होती. आडसाली ऊस असल्याने ऊसाचे पिकही जोमात आले होते. तारख यांच्या शेतातून वडीगोद्री ३३ के.व्ही.उप केंद्रातून शहागड फिडरची कृषी पंपासाठी वीज वाहिनी गेलेली आहे. तर याच शेतातून गावठाण फिडर ची वीज वाहिनी गेली आहे.
किरण तारख यांच्या शेतात वीज वाहिनीचे जाळे असल्याने या १५ एकर क्षेत्रात २० विजांचे खांब आहेत. एलटी लाईट,११ केव्ही कृषी व ११ केव्ही गावठाण अश्या तीन वीज वाहिन्या तारख यांच्या शेतातून गेल्या आहेत. यामुळे वारंवार विद्युत तारामुळे ऊस पेटण्याच्या घटना घडत आहेत.
नेहमी हाता तोंडाशी आलेले उभं पिक आगीत जळून खाक होत असल्याने दरवर्षी लाखो रुपयांचे नुकसान होत असल्याने तारख चांगलेच आक्रामक झाले आहेत. महावितरणने तात्काळ यावर कायमस्वरुपी तोडगा काढावा अन्यथा कुटुंबासह आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.