भर कीर्तनातच बाबांनी घेतला अखेरचा श्वास, ताजुद्दीन बाबा यांचे दुर्दैवी निधन

ताजुद्दीन बाबा हे जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील बोधलापूर येथे राहत होते. त्यांनी स्वतः विठ्ठल रुखमाई यांचं देऊळ उभे केले होते. नेहमी प्रमाणे ताजुद्दीन महाराज यांचे कीर्तन सुरू होते. त्यांच्या या कीर्तनाला नागरिकांनीही मोठी गर्दी केली होती.

    हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेले ताजुद्दीन बाबा यांचं अचानक दुर्दैवी निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. कीर्तन करतांना उभे असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि ते खाली बसले. त्यानंतर मंचावरच त्यांचे निधन झाले. ही घटना काल रात्री नंदुरबार येथे घडली.

    ताजुद्दीन बाबा हे जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील बोधलापूर येथे राहत होते. त्यांनी स्वतः विठ्ठल रुखमाई यांचं देऊळ उभे केले होते. नेहमी प्रमाणे ताजुद्दीन महाराज यांचे कीर्तन सुरू होते. त्यांच्या या कीर्तनाला नागरिकांनीही मोठी गर्दी केली होती. त्याचवेळी त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला आणि ते स्टेजवर खाली बसले. कीर्तन सुरू असताना काही जण आपल्या मोबाइलमध्ये हे शूट करत होते. त्याचवेळी ताजुद्दीन महाराजांना ह्रदयविकाराचा झटका आल्याने ही संपूर्ण घटना मोबाइल कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

    हिंदू मुस्लिम दोघांतील दरी मिटवण्यासाठी त्यांनी हजारो कीर्तने केली. त्यांचा जन्म औरंगाबाद जवळील सातारा भागात झाला होता. त्यांनी काही काळ पुणे येथे जाऊन कंपनी मध्ये काम ही केले होते. त्यांना लहानपणापासूनच कीर्तनाची आवड होती.