Big News: लॉकडाऊनची तयारी सुरु; महाराष्ट्रात दारुची दुकाने बंद करण्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपेंचे स्पष्ट संकेत

गर्दी होत असेल तर दारुची दुकानंही बंद करावी लागतील असा सूचक इशारा राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे(Lockdown preparations begin; Health Minister Rajesh Tope's clear signal to close liquor shops in Maharashtra). कोरोनाच्या ओमायक्रॉनचा संसर्ग राज्यात आणि देशात वाढत असताना, शनिवारी काही निर्बंध लावण्यात आले आहेत. सोमवारपासून त्याची अंमलबाजवणी करण्यात येणार आहे.

  जालना : गर्दी होत असेल तर दारुची दुकानंही बंद करावी लागतील असा सूचक इशारा राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे(Lockdown preparations begin; Health Minister Rajesh Tope’s clear signal to close liquor shops in Maharashtra). कोरोनाच्या ओमायक्रॉनचा संसर्ग राज्यात आणि देशात वाढत असताना, शनिवारी काही निर्बंध लावण्यात आले आहेत. सोमवारपासून त्याची अंमलबाजवणी करण्यात येणार आहे.

  मात्र त्यात दारुची दुकाने, रेस्टॉरंट यांना काही प्रमाणात सूट देण्यात आली आहे. गर्दी कमी करुन सकाळी ७ ते रात्री ९ पर्यंत त्यांना परवानगी देण्यात आली आहे. मात्र गर्दी वाढली तर सगळेच बंद करावे लागेल, असा इशारा राजेश टोपे यांनी दिला आहे. ते जालन्यात पत्रकारांशी बोलत होते.

  राज्यात कोरोनाच्या रुग्णांत झपाट्यात वाढ होत असल्यानं नवे निर्बंध लागू करण्यात आलेत. राज्यात ऑक्सिजनची मागणी वाढून हॉस्पिटलमध्ये बेड कमी पडत नाही तोपर्यंत आणखी नवे निर्बंध लावले जाणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. त्याबाबत टोपे यांनी माहिती दिलीये.

  यामध्ये शाळाही बंद ठेवण्यात आल्यात मात्र दारुची दुकानं सुरु असल्यानं विरोधक टीका करतांना बघायला मिळताहेत. त्यामुळं गर्दी होत असेल तर दारुची दुकानंही बंद करावी लागतील असा इशारा टोपे यांनी दिला.

  तर धार्मिक स्थळेही करणार बंद

  धार्मिक स्थळांमध्येही गर्दी होत असेल तर त्याबाबतही टप्प्याटप्यानं निर्णय घेण्यात येईल असं टोपे यांनी म्हंटलंय. राज्यात ऑक्सीजनची मागणी नगण्य वाढली असून दखल घेण्यासारखी ही मागणी नाही असंही त्यांनी सांगितलं. कोरोनाचा संसर्ग कमी होण्यासाठी सर्व उपाययोजना कराव्या लागतील, असे त्यांनी सांगितले आहे.

  हे सुद्धा वाचा
  • 2022