crime scene

एका तरुणानं दीड एकर जमिनीसाठी आपल्या म्हाताऱ्या वडिलांची गळा आवळून हत्या (Son Killed Father) केली आहे. ही घटना उघडकीस येताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन आरोपी मुलाला अटक (Arrest) केली आहे.

    अंबड: जालना (Jalna) जिल्ह्यातील अंबड याठिकाणी एक विचित्र घटना समोर आली आहे. एका तरुणानं दीड एकर जमिनीसाठी आपल्या म्हाताऱ्या वडिलांची गळा आवळून हत्या (Son Killed Father) केली आहे. ही घटना उघडकीस येताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन आरोपी मुलाला अटक (Accused son arrest) केली आहे. याप्रकरणी आरोपीला न्यायालयात हजर केलं असता, न्यायालयानं त्याला 30 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

    पंढरीनाथ भवर असं हत्या झालेल्या वडिलांचं नाव आहे. तर सर्जेराव पंढरीनाथ भवर असं आरोपी मुलाचं नाव आहे. आरोपी मुलगा आपल्या आई-वडिलांसोबत अंबड तालुक्यातील झिरपी पांडा याठिकाणी वास्तव्याला होता. मागील काही दिवसांपासून आरोपी मुलगा वडिलोपार्जित जमीन आपल्या नावावर करावी, यासाठी तगादा लावला होता. पण वडिलांनी जमीन मुलाच्या नावावर करण्यास नकार दिला. यामुळे मुलाचा आपल्या वडिलांवर राग होता.

    यातूनच आरोपी मुलानं 25 जुलै रोजी रविवारी पहाटे आपल्या वयोवृद्ध वडिलांची दोरीनं गळा आवळून हत्या केली आहे. रविवारी सकाळी ही घटना उघडकीस येताच, परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दीड एकर जमिनीच्या मोहापोटी आरोपीनं आपल्या वडिलांची हत्या केल्यानं परिसरात हळहळ व्यक्त केली जात होती.

    या घटनेची माहिती मिळताच अंबड पोलिसांनी घटनास्थळी धाव घटनेचा पंचनामा केला आहे. तसेच आरोपी मुलगा सर्जेराव भवर यालाही अटक केली. 26 जुलै रोजी आरोपीला न्यायालयात हजर केलं असता, न्यायालयानं आरोपीला 30 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेची पुढील कारवाई पोलीस करत आहेत.