raosaheb danave

दानवे म्हणाले की, राहुल गांधींना कोणीही धक्काबुक्की केली नाही. ते गर्दीतून जात असताना त्यांचा तोल गेला असावा. एवढ्या मोठ्या नेत्याला कोणीही धक्काबुक्की करु शकत नाही. अशा गर्दीत आम्ही देखील अनेक वेळा जातो. पब्लिकचा रेटा असतो. तिथे नेत्यांच्या पुढे पुढे करणाऱ्यांची गर्दी असते, त्यामुळे कदाचित अस झालं असावं.

जालना : उत्तर प्रदेश येथील हाथरस (Hathras) सामूहिक बलात्कार (Hathras rape) प्रकरणातील पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी गुरुवारी काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) गेले होते. त्यांच्यासोबत उत्तर प्रदेश पोलिसांनी धक्काबुक्की केल्याची घटना काल समोर आली होती. या घटनेवरुन मोठं राजकीय वादळ उठलं आहे. आतापर्यंत देशभरातील अनेक पक्षांनी, नेत्यांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे. आता या घटनेबाबत केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve)  यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

दानवे म्हणाले की, राहुल गांधींना कोणीही धक्काबुक्की केली नाही. ते गर्दीतून जात असताना त्यांचा तोल गेला (Lost balance while walking) असावा. एवढ्या मोठ्या नेत्याला कोणीही धक्काबुक्की करु शकत नाही. अशा गर्दीत आम्ही देखील अनेक वेळा जातो. पब्लिकचा रेटा असतो. तिथे नेत्यांच्या पुढे पुढे करणाऱ्यांची गर्दी असते, त्यामुळे कदाचित अस झालं असावं.

सर्व माध्यमांनी राहुल गांधींना पोलिसांनी धक्काबुक्की केल्याच्या बातम्या प्रसिद्ध केल्या आहेत. काँग्रेससह अनेक पक्षांच्या बड्या नेत्यांनी या घटनेबाबत संताप व्यक्त केला आहे. त्यातच रावासाहेब दानवे यांनी धक्काबुक्की झालीच नाही असा दावा केला आहे.