Shiv Sena leader Arjun Khotkar scolds Nitesh Rane

भाजपा नेते नीतेश राणे यांनी शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. रझा अकादमीने नांदेडमध्ये आयोजित केलेल्या आंदोलनाविरोधात कारवाई करण्याची मागणी करत खोतकर यांनी रझा अकादमीच्या मंचावर भडकाऊ भाषण केल्यामुळे अमरावतीमध्ये दंगली झाल्या, असा आरोप नीतेश यांनी केला आहे(Shiv Sena leader Arjun Khotkar scolds Nitesh Rane).

    जालना : भाजपा नेते नीतेश राणे यांनी शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. रझा अकादमीने नांदेडमध्ये आयोजित केलेल्या आंदोलनाविरोधात कारवाई करण्याची मागणी करत खोतकर यांनी रझा अकादमीच्या मंचावर भडकाऊ भाषण केल्यामुळे अमरावतीमध्ये दंगली झाल्या, असा आरोप नीतेश यांनी केला आहे(Shiv Sena leader Arjun Khotkar scolds Nitesh Rane).

    नीतेश यांच्या आरोपांना खोतकर यांनीही जोरदार उत्तर दिले आहे. या फुटाण्या-शेंगदाण्याला काही काम राहिले नसून हे किती बेअकली लोक आहे, हे यावरून समोर आल्याचे खोतकर यांनी म्हटले आहे. आपण नांदेडला गेलोच नाही. मी जालन्यातील रजा अकादमीच्या मोर्चात जाऊन तिथे शांतता आणि सलोखा राखण्याचे आवाहन केले, असेही खोतकर म्हणाले.

    मी नांदेडला गेलोच नव्हतो, हे उघड आहे. यामुळे भाजपा नेते तोंडघाशी पडले असून त्यांना जालन्यात घुसू न दिल्याने जालन्यात दंगल झाली नाही अन्यथा जालन्यातदेखील अमरावती सारखी दंगल झाली असती. जालन्यातील मोर्चात मी असल्याने दंगल झाली नाही ही भाजपाची खरी पोटदुखी असल्याचे अर्जुन खोतकर म्हणाले.