प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

    जालना : मराठा आरक्षणाच्या निर्णयाला विलंब होत असल्याने समाजातील तरुण नैराश्याच्या गर्तेत जात आहेत. अशातच जालना येथील एका मराठा तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

    परतुर तालुक्यातील येनोरा येथील ही घटना आहे. सदाशिव शिवाजी भुंबर ( वय २५ ) असे तरुणाचे नाव आहे. सदाशिव हा पुणे येथील एका खाजगी कंपनीत नोकरी करीत होता. त्याने इलेक्ट्रिशियनचा कोर्स केलेला आहे. नोकरी मिळत नसल्याने वीस – पंचवीस दिवसांपूर्वी तो गावाकडे
    येनोरा येथे आला होता.

    त्याला चार एकर शेती आहे. मात्र गावाकडे ही सतत पाऊस असल्याने शेतातील पिकेही गेली आहे. यामुळे तो प्रचंड मानसिक तणावात होता. याच तणावातून त्याने घराच्या छताला गळफास लावून आत्महत्या केली.

    ओला दुष्काळ व मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याच्या नैराश्यातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे चुलते अंकुश भुंबर यांनी सांगितले. दरम्यान, आष्टी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. उपविभागीय पोलिस अधिकारी राजू मोरे यांनी घटनास्थळी भेट दिली आहे .