इंधन दरवाढी विरोधात राष्ट्रवादीच्या वतीने आंदोलन; केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी

महाराष्ट्र राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने मा. मेहबूब भाई शेख यांच्या आदेशानुसार राष्ट्रवादी युवक काँग्रेस औसा तालुका व शहर यांच्या वतीने आज आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

    औसा : २०१४ साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भ्रष्ट्राचार आणि महागाईचा मुद्दा घेऊन निवडणूक लढवली होती, यामुळे या निवडणूकीत त्यांना घवघवीश मिळून सत्ता स्थापन करता आली होती. मात्र २०१९ साली भाजप सरकार पुन्हा एकदा सत्तेत आले, मोदींचा ७ वर्षाचा कार्यकाळ पुर्ण होत आला तरी देखील देशातील महागाई कमी व्हायचं नाव घेत नाही.

    दरम्यान याचं पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने मा. मेहबूब भाई शेख यांच्या आदेशानुसार राष्ट्रवादी युवक काँग्रेस औसा तालुका व शहर यांच्या वतीने आज आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

    यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते विधानसभा अध्यक्ष श्री दत्तात्रय अण्णा कोळपे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस ॲड निशांत वाघमारे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकध्यक्ष ॲड. शिवाजी सावंत, कार्याध्यक्ष श्री.अविनाश टिके, शहराध्यक्ष ॲड. संताजी औटी, आदी उपस्थित होते.