
भाजप नेते किरीट सोमय्या लातूर दौऱ्यावर आले होते. किरीट सोमय्यांच्या टार्गेटवर यावेळी माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांचे कुटुंबीय आहेत. विलासराव देशमुख यांच्या कुटुंबीयांनी ज्या ज्या साखर कारखान्यांसोबत व्यवहार केला आहे त्या सर्व व्यवहारांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करणार असल्याचे किरीट सोमय्या म्हणाले.
लातूर : भाजप नेते किरीट सोमय्या लातूर दौऱ्यावर आले होते. किरीट सोमय्यांच्या टार्गेटवर यावेळी माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांचे कुटुंबीय आहेत. विलासराव देशमुख यांच्या कुटुंबीयांनी ज्या ज्या साखर कारखान्यांसोबत व्यवहार केला आहे त्या सर्व व्यवहारांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करणार असल्याचे किरीट सोमय्या म्हणाले. त्यामुळे सोमय्यांनी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसपाठोपाठ आता काँग्रेस नेत्यांकडे आपला मोर्चा वळवल्याचे स्पष्ट झाले आहे.
४० घोटाळे बाहेर काढणार
लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथील सिद्धी, उदगीर येथील प्रियदर्शिनी साखर कारखान्याची चौकशी ही सुरु केली असून इतरही साखर कारखान्याबाबत ईडीकडे कागदपत्रे देणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. येत्या ३१ डिसेंबरपर्यंत राज्यातील ४० घोटाळे बाहेर काढणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
सोमय्यांच्या टार्गेटवर देशमुख परिवार
लातूर मधील साखर करखान्याच्या व्यवहाराची चौकशी करून डिसेंबर अखेर भ्रष्टाचार समोर आणणार आहे. विलासराव देशमुख आणि त्यांचा परिवार यांनी देखील ज्या साखर कारखान्याचे व्यवहार केले आहेत त्याची मी चौकशी करण्याची मागणी करणार आहे. माफिया पद्धतीने लातूर जिल्हा बँक काँग्रेसने ताब्यात घेतली, असल्याचा आरोप सोमय्यांनी केला.
दरम्यान, नवाब मलिक यांचे समीर वानखेडे यांच्यावरील आरोप हे अजित पवार यांच्यावरील भ्रष्टाचाराचे लक्ष विचलित करण्यासाठी सुरु असल्याचा आरोप सोमय्या यांनी यावेळी केला. संजय राऊत यांनी मला पाठविलेल्या पत्राला उद्धव ठाकरे यांनी दमडीचेही महत्व दिले नसून त्यांचे पत्रावर फक्त सीआयडी चौकशी होऊ शकते असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.