भाजपचे आमदार अभिमन्यू पवार यांची शेतकऱ्यांसाठी पदयात्रा

राज्य सरकारच्या वतीने शेतकऱ्यांना दिलेली मदत अत्यंत तुटपुंजी आहे. या संदर्भात आपण तहसीलदार, जिल्हाधिकारी, मंत्री, मुख्यमंत्री या सर्वांना निवेदन देऊन आता थकलो आहोत. त्यामुळे आता आई तुळजाभवानी चरणी निवेदन अर्पण करत असल्याचे मत भाजपचे आमदार अभिमन्यू पवार यांनी व्यक्त केल.

    लातूर : राज्य सरकारच्या वतीने शेतकऱ्यांना दिलेली मदत अत्यंत तुटपुंजी आहे. या संदर्भात आपण तहसीलदार, जिल्हाधिकारी, मंत्री, मुख्यमंत्री या सर्वांना निवेदन देऊन आता थकलो आहोत. त्यामुळे आता आई तुळजाभवानी चरणी निवेदन अर्पण करत असल्याचे मत भाजपचे आमदार अभिमन्यू पवार यांनी व्यक्त केलय.

    शेतकऱ्यांना भरघोस मदत मिळावी या मागणीसाठी त्यांनी औसा ते तुळजापूर पदयात्रा काढली. या निमित्त ते बोलत होते. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना कोकणामध्ये आलेल्या महापुरग्रस्तांना नियमाच्या बाहेर जात मदत देण्यात आली होती. त्याच प्रमाणे मदत मराठवाड्यातील आणि विदर्भातील शेतकऱ्यांना देण्यात यावी, अशी मागणी आपण केली होती. मात्र, राज्य सरकारने शेतकऱ्यांना तोंडाला पाने पुसली असून त्यांनी केलेली मदत अत्यंत तुटपुंजी असल्याचा आरोप आमदार पवार यांनी केला आहे.

    दरम्यान राज्यातील महाविकास आघाडी सरकारला शेतकऱ्यांना मदत करण्याची बुद्धी दे, अशी मागणी आपण आई तुळजाभवानी चरणी करत असल्याचेही ते म्हणाले. मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अशा शेतकऱ्यांना भरीव मदत करण्याची मागणी करण्यात येत आहे.