मांजरा नदीलगतच्या शेतीचे नुकसान, पिके पाण्यात जात असल्याने शेतकरी चिंतेत

मांजरा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु असतानाच धरण क्षेत्रात पावसाचा जोर हा कायम आहे. त्यामुळे धोका हा टळलेला नाही. पावसाचा फटका आगोदरच पिकांना बसलेला आहे. आता शेतामध्येच पाणी साठत असल्याने शेती कामे करावित कशी असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे.

  लातूर : पावसाला ब्रेक लागत असला तरीही आता नदी पात्रातील पाणी शेतामध्ये साठत आहे. मांजरा धरण हे पूर्ण क्षमतेने भरले असून आता या धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. याचा फटका मांजरा नदी लगतच्या शेतांना बसत आहे. आगोदरच पावसामुळे खरीपातील सोयाबीन हे चिखलात आहे आता नदीचे पाणीच या पिकामध्ये साठत असल्याने काढणीची कामे करावित तरी कशी असा सवाल उपस्थित होत आहे.

  दरम्यान गेल्या पंधरा दिवसापासून होत असलेल्या पावसामुळे मांजरा धरण हे 100 टक्के भरलेले आहे. त्यामुळे धरणातून 149.80 घनमीटर प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग सुरु आहे. शिवाय नदीलगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

  शेतकरी चिंतेत

  पाण्याच्या विससर्गामुळे शिरुरअंतपाळ तालुक्यातील फकरानपूर, वांजरखेडा, हालकी, डोंगरगाव, उजेड बिबराळ, बाकली यांसह राणी अंकुलगा शिवारात पाणी साठल्याने पूर स्थिती निर्माण झाली आहे. मांजरा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु असतानाच धरण क्षेत्रात पावसाचा जोर हा कायम आहे. त्यामुळे धोका हा टळलेला नाही. पावसाचा फटका आगोदरच पिकांना बसलेला आहे. आता शेतामध्येच पाणी साठत असल्याने शेती कामे करावित कशी असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे.

  मांजरा धरण हे ओव्हरफ्लो

  त्यामुळे नुकसानीचे कोणतेही निकष लावण्यात वेळ खर्ची न करता थेट आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकरी हे करीत आहेत. आतापर्यंत हे धरण 14 वेळा हे धरण भरले आहे. यापुर्वी 2017 साली हे धरण भरले होते. यंदा मराठवाड्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे मराठवाड्यातील आठही प्रमुख धरणे ही भरलेल्या अवस्थेत आहेत. मंगळवारी मांजरा धरण हे ओव्हरफ्लो झाले असून धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याचा येवा हा सुरु असून पाणीसाठा नियंत्रणात ठेवण्यासाठी सहा दरवाजे हे उघडण्यात आले आहेत.

  नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

  सध्या धरणातून 149.80 घनमीटर प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग सुरु आहे. मांजरा धरणात पाण्याचा येवा मोठ्या प्रमाणात आहे. शिवाय आजही पावसाचा अंदाड हा व्यक्त करण्यात आला असल्याने लातूर तालुक्यातील कानडी बोरगाव, टाकळगाव, सारसा, वांजरखेडा, बोडका, पोहरेगाव, नागझरी, जेवळी, टाकळी या मांजरा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.