लातूर जिल्‍हा बँक निवडणुक, भाजपाला दिवाळी गोड, ‘या’ तारखेला होणार मतदान

लातूर जिल्‍हा मध्‍यवर्ती सहकारी बँकेच्‍या संचालक मंडळ निवडीसाठी २१ नोव्‍हेंबरला मतदान होणार आहे. या निवडणुकीत सत्‍ताधाऱ्यांच्‍या विरोधात भाजपाने सर्व जागांवर ३५ उमेदवारांचे अर्ज दाखल केले होते. प्रत्‍येक मतदारसंघात तोडीस तोड उमेदवार देण्‍याचा प्रयत्‍न भाजपाने केला आहे.

  लातूर : येथील जिल्‍हा मध्‍यवर्ती सहकारी बँकेच्‍या निवडणुकीत निवडणुक निर्णय अधिकारी यांनी छाननीत अवैध ठरविलेल्‍या उमेदवारांनी विभागीय सहनिबंधक सहकारी संस्‍था लातूर यांच्‍याकडे दाखल केलेल्‍या अपिलाचा निर्णय होवून विरोधी नऊ जणांचे दहा उमेदवारी अर्ज वैध ठरविण्‍यात आले.

  दरम्यान या निकालामुळे सत्‍ताधाऱ्यांना मोठी चपराक बसली आहे अशी प्रतिक्रिया भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष आमदार रमेशअप्‍पा कराड यांनी दिली. लातूर जिल्‍हा मध्‍यवर्ती सहकारी बँकेच्‍या संचालक मंडळ निवडीसाठी २१ नोव्‍हेंबरला मतदान होणार आहे. या निवडणुकीत सत्‍ताधाऱ्यांच्‍या विरोधात भाजपाने सर्व जागांवर ३५ उमेदवारांचे अर्ज दाखल केले होते. प्रत्‍येक मतदारसंघात तोडीस तोड उमेदवार देण्‍याचा प्रयत्‍न भाजपाने केला आहे.

  अवैध ठरविलेल्‍या विरोधी ९ जणांचे १० उमेदवारी अर्ज मंजूर

  जिल्‍हा बँकेच्‍या निवडणुकीसाठी दाखल झालेल्‍या अर्जाची गेल्‍या २० ऑक्‍टोबरला छाननी झाली. या छाननीत सत्‍ताधाऱ्यांकडून विरोधकांच्‍या सर्व उमेदवारांवर आक्षेप नोंदवण्‍यात आले. निवडणूक निर्णय अधिकारी विजयकुमार ढगे यांनी या आक्षेपाच्‍या सुनावणी अंती विरोधकांचे सर्व अर्ज अवैध ठरविले. निवडणुक निर्णय अधिकारी यांनी दिलेल्‍या या निर्णयाविरोधात विभागीय सहनिबंधक सहकारी संस्‍था लातूर यांच्‍याकडे भाजपने अपिल केले. दोन्‍ही बाजूचे म्‍हणणे ऐकुन विभागीय सहनिबंधक रावळ यांनी अवैध ठरविलेल्‍या विरोधी ९ जणांचे १० उमेदवारी अर्ज मंजूर केले आहेत.

  या उमेदवारांचे अर्ज वैध

  उमेदवारी अर्ज मंजूर केलेल्‍यांमध्‍ये भगवान रामचंद्र पाटील तळेगावकर (सोसायटी मतदारसंघ देवणी), संतोष नागोराव सारंगे (सोसायटी मतदारसंघ शिरूर), अनंतपाळ, बाबु हणमंतराव खंदाडे (इतर मागासवर्ग मतदारसंघ), ओमप्रकाश गिरीधर नंदगावे (भटक्‍या विमुक्‍त जाती मतदारसंघ), सतीश रावसाहेब आंबेकर (मजूर फेडरेशन मतदारसंघ), नवनाथ शिवराज डोंगरे नागरी बँका मतदारसंघ), सुरेखा रमाकांत मुरूडकर, अजंजी सुनिल कावळे, सय्यद इकबालबेगम ईस्‍माइल (महिला प्रतिनिधी मतदारसंघ) आणि अंजली सुनिल कावळे (अनुसूचित जाती मतदारसंघ) या ९ जणांचे १० उमेदवारी अर्ज विभागीय सहनिबंधक रावळ यांनी वैध ठरविले आहेत.