लातूर जिल्‍हा बँक निवडणुकीत नऊ विरोधकांचे उमेदवारी अर्ज वैध; सत्‍ताधाऱ्यांना चपराक

लातूर जिल्‍हा मध्‍यवर्ती सहकारी बँकेच्‍या निवडणुकीत निवडणुक निर्णय अधिकारी यांनी छाननीत अवैध ठरविलेल्‍या उमेदवारांनी विभागीय सहनिबंधक सहकारी संस्‍था लातूर यांच्‍याकडे दाखल केलेल्‍या अपिलाचा निर्णय होवून विरोधी नऊ जणांचे दहा उमेदवारी अर्ज वैध ठरविण्‍यात आले. या निकालामुळे सत्‍ताधाऱ्यांना मोठी चपराक बसली असून सत्‍य परेशान हो सकता है लेकीन पराजीत नही अशी प्रतिक्रिया भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष आ. रमेश कराड यांनी दिली.

  लातूर : लातूर जिल्‍हा मध्‍यवर्ती सहकारी बँकेच्‍या निवडणुकीत निवडणुक निर्णय अधिकारी यांनी छाननीत अवैध ठरविलेल्‍या उमेदवारांनी विभागीय सहनिबंधक सहकारी संस्‍था लातूर यांच्‍याकडे दाखल केलेल्‍या अपिलाचा निर्णय होवून विरोधी नऊ जणांचे दहा उमेदवारी अर्ज वैध ठरविण्‍यात आले. या निकालामुळे सत्‍ताधाऱ्यांना मोठी चपराक बसली असून सत्‍य परेशान हो सकता है लेकीन पराजीत नही अशी प्रतिक्रिया भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष आ. रमेश कराड यांनी दिली.

  लातूर जिल्‍हा मध्‍यवर्ती सहकारी बँकेच्‍या संचालक मंडळ निवडीसाठी येत्‍या २१ नोव्‍हेंबर रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीकरीता सत्‍ताधाऱ्यांच्‍या विरोधात भाजपाच्‍या वतीने सर्व जागेवर सक्षम इच्‍छुक ३५ उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले होते. प्रत्‍येक मतदार संघात तोडीस तोड उमेदवार देण्‍याचा प्रयत्‍न भाजपाच्‍या वतीने करण्‍यात आला होता.

  जिल्‍हा बँकेच्‍या निवडणुकीसाठी दाखल झालेल्‍या अर्जाची गेल्‍या २० ऑक्‍टोबर २०२१ रोजी छाननी झाली. या छाननी मध्‍ये सत्‍ताधाऱ्यांकडून विरोधकांच्‍या सर्व उमेदवारीवर आक्षेप नोंदवण्‍यात आले. निवडणूक निर्णय अधिकारी विजयकुमार ढगे यांनी सदरील आक्षेपाच्‍या सुनावनी अंती विरोधकांचे सर्व अर्ज अवैध ठरविले. निवडणुक निर्णय अधिकारी यांनी दिलेल्‍या या निर्णयाविरोधात विभागीय सहनिबंधक सहकारी संस्‍था लातूर यांच्‍याकडे अपिल करण्‍यात आले. सदरील अपिलाची सुनावनी २८ ऑक्‍टोबर २०२१ रोजी झाली. त्‍यात दोन्‍ही बाजूचे म्‍हणणे ऐकुन घेवून विभागीय सहनिबंधक रावळ यांनी अवैध ठरविलेल्‍या विरोधी ९ जणांचे १० उमेदवारी अर्ज मंजूर केले आहेत.

  उमेदवारी अर्ज मंजूर केलेल्‍या मध्‍ये भगवान रामचंद्र पाटील तळेगावकर सोसायटी मतदार संघ देवणी, संतोष नागोराव सारंगे सोसायटी मतदार संघ शिरूर अनंतपाळ, बाबु हणमंतराव खंदाडे इतर मागासवर्ग मतदार संघ, ओमप्रकाश गिरीधर नंदगावे भटक्‍या विमुक्‍त जाती मतदार संघ, सतिष रावसाहेब आंबेकर मजूर फेडरेशन मतदार संघ, नवनाथ शिवराज डोंगरे नागरी बँका मतदार सघ, सौ. सुरेखा रमाकांत मुरूडकर, सौ. अजंजी सुनिल कावळे, सय्यद इकबालबेगम ईस्‍माइल महिला प्रतिनिधी मतदार संघ आणि अंजली सुनिल कावळे अनु. जाती मतदार संघ या ९ जणांचे १० उमेदवारी अर्ज विभागीय सहनिबंधक रावळ यांनी वैध ठरविले आहेत.

  जिल्‍हा बँकेच्‍या निवडणुकीत अत्‍यंत चुकीच्‍या पध्‍दतीने अधिकारीचा गैरवापर करून बेकायदेशीररित्‍या विरोधी उमेदवारांचे अर्ज बाद केल्‍याने संबंधीत अधिकाऱ्यांच्‍या या मनमानी कारभाराविरूध्‍द थेट राज्‍याचे महामहीम राज्‍यपाल भगतसिंहजी कोश्‍यारी यांच्‍याकडे भाजपाचे आ. संभाजीराव पाटील निलंगेकर, आ. रमेशअप्‍पा कराड, आ. अभिमन्‍यू पवार, यांच्‍यासह सत्‍ताधाऱ्यांच्‍या विरोधात अर्ज दाखल केलेले उमेदवार आदींच्‍या शिष्‍टमंडळाने भेट घेवून निवडणुक प्रक्रियेतील अनेक महत्‍वाचे दस्‍तावेज त्‍यांच्‍याकडे सुपूर्त केले होते.

  लातूर जिल्‍हा मध्‍यवर्ती सहकारी बँकेतील एकाधिकारशाही व निवडणूक होणारच नाही ही ठाम भुमिका घेवून साम धाम दंड भेद याचा वापर करून निवडणूक बिनविरोध काढण्‍याचे सत्‍ताधाऱ्यांचे स्‍वप्‍न धुळीस मिळाले आहे. उमेदवारी अर्ज वैध ठरल्‍याने निवडणुकीचे काम करणारे अधिकारी सत्‍ताधाऱ्यांचे दलाल असल्‍याचे सिध्‍द झाले असून सत्‍य परेशान हो सकता है लेकीन पराजीत नही अशी प्रतिक्रिया देवून भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष आ. रमेशअप्‍पा कराड म्‍हणाले की विभागीय सहनिबंधक यांनी अवैध ठरविलेला उर्वरीत उमेदवारी अर्जाबाबत उच्‍च न्‍यायालयाच्‍या खंडपिठात दाद मागणार आहोत.