आधी विष पाजले मग गळा चिरला! ऐनवेळी 14 वर्षीय मुलाला शुद्ध आल्याने मोठा अनर्थ टळला; लातुरमधील थारारक घटनेने महाराष्ट्र हादरला!

  लातूर : एका शेतकऱ्याने आपल्या पत्नीला आणि मुलांना विष पाजून त्यांचा गळा चिरला ( give poison to drink and slit throat with blade) आहे. एवढंच नव्हे तर संबंधित शेतकऱ्यानेही विष प्राशन करून स्वत:चा गळा चिरून आत्महत्येचा प्रयत्न (Farmer attempt to commits suicide) केला आहे.  लातूर (Latur) जिल्ह्यातील रेणापूर येथे महाराष्ट्राला हादरवणारी ही घटना घडली आहे. ऐनवेळी 14 वर्षीय मुलाला शुद्ध आल्याने मोठा अनर्थ टळला आहे.

  आतिष बाबूराव नरके असं या शेतकऱ्याचे नाव आहे. ते लातूर येथील रहिवासी आहेत. आतिष पत्नी विशाखा (34), मुलगा पारस (14) आणि लोकेश (12) यांना दुचाकीने अंबाजोगाईला घेऊन गेले. यानंतर त्यांनी सर्वांना हॉटेलमध्ये जेवू घातलं आणि पुन्हा लातूरकडे निघाले. दरम्यान वाटेत मध्येच त्यांनी शेतातील उसाच्या फडाजवळ जाऊन दुचाकी थांबवली.

  टॉनिक असल्याचं सांगून त्यांनी पत्नीसह दोन्ही मुलांना विष पाजलं. यानंतर सर्वांची शुद्ध हरपल्यानंतर नरके यांनी तिघ्यांच्या गळ्यावर ब्लेडने वार केले. त्यानंतर स्वत:ही विष प्राशन केलं आणि ब्लेडने गळ्यावर वार करून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या थरारक घटनेनंतर काही वेळातच 14 वर्षीय पारस शुद्धीत आला.

  त्याने तातडीने वडिलांच्या मोबाइलवरून आपले मामा श्रीकांत पवार (सुगाव, ता. अंबाजोगाई) यांना फोन केला आणि घटनेची माहिती दिली. पावार आपल्या काही नातेवाईकांना घेऊन तातडीने घटनास्थळी दाखल झाले. याठिकाणी पोहोचल्यानंतर, त्यांना मेहुणे आतिष नरके, बहीण विशाखा नरके, भाचा पारस आणि लोकेश सर्वजण रक्ताच्या थारोळ्यात आढळले.

  पारस थोडा शुद्धीवर होता तर इतर तिघे बेशुद्ध होते. पवार यांनी स्थानिकांच्या मदतीने चौघांना लातूरच्या एमआयटी रुग्णालयात दाखल केलं. पारस आणि मेहुणे आतिष नरके शुद्धीवर आले असून लोकेश आणि विशाखा यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली. कर्जबाजारीपणाला कंटाळून पत्नीसह मुलांची हत्या करून आपणही आत्महत्येचे पाऊल उचलल्याचे आतिष यांनी सांगीतले.

  हे सुद्धा वाचा
  • 2022