हातातोंडाशी आलेला घास पावसाने नेला; मुसळधार पावसामुळे मराठवाड्यातील ‘या’ भागात पिकांचं मोठं नुकसान

राज्यभरात मोठ्या प्रमाणात अतिमुसळधार पावसाने पिकांचे आणि रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. लातूर तालुक्यातीलही बहुतांश भागात शेतामधील पिकांमध्ये पाणी शिरल्यामुळे शेतकरी हवालदील झाले आहेत. आता सोयाबीन काढणीला सुरुवात करत असतानाचं हातातोंडाशी आलेला घास पावसाने नेला असचं म्हणाव लागेल.

    लातूर : सध्या काही दिवसांपासून मुसळधार पावसानं चांगलीच हजेरी लावली आहे. त्यामुळे राज्यातील अनेक भागांत अतिवृष्टी झाल्याचं दिसतंय. राज्यभर जोरदार पाऊस पडल्यानं शेतकरी आणि शेतीचं प्रचंड प्रमाणात नुकसान होत आहे.

    राज्यभरात मोठ्या प्रमाणात अतिमुसळधार पावसाने पिकांचे आणि रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. लातूर तालुक्यातीलही बहुतांश भागात शेतामधील पिकांमध्ये पाणी शिरल्यामुळे शेतकरी हवालदील झाले आहेत. आता सोयाबीन काढणीला सुरुवात करत असतानाचं हातातोंडाशी आलेला घास पावसाने नेला असचं म्हणाव लागेल. तसेचं लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील भेटा गावात सतत चालू असणाऱ्या मोठ्या पावसानं शेती आणि रस्त्यांचे नुकसान झालं आहे. त्यामुळे शेतकऱ्याची चिंता वाढली आहे. यातच जिल्ह्यातील अनेक गावात मोठ्या प्रमाणात रस्ते वाहून गेल्यानं गावांचा संपर्कही तुटला आहे.

    तसेचं इतर भागात देखील मोठं नुकसान होताना दिसत आहे. लातूर जिल्ह्यात गेला काही दिवसांपासून खूप पाऊस पडत आहे. या पावसामुळे हातातोंडाशी आलेलं सोयाबीन पीक पाण्यात वाहून जात आहे. लातूर जिल्ह्यात सोयाबीन पीक हे प्रमुख पीक आहे. यावरच शेतकरी अवलंबून आहेत. त्यामुळे आता पावसानं शेतकऱ्यांची चिंता वाठली आहे.

    दरम्यान, गुलाब चक्रीवादळाचा परिणाम हा राज्यावर होताना दिसत आहे. त्यामुळे राज्यात आज आणि उद्या मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच अतिवृष्टीचा धोका कायम आहे. गुलाब चक्रीवादळामुळे कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे.