भरसभेत छगन भुजबळांनी दिलं किरीट सोमय्यांना खुलं आव्हान, नेमकं काय म्हणाले? : वाचा सविस्तर

अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी नांदेड येथे किरीट सोमय्यांवर टीकेची तोफ डागली. किरीट सोमय्या नांदेडला कशासाठी येत आहेत?, त्यांनी मुंबईला बसून आरोप करावे, असं म्हणत भाजपच्या नेत्यांनी केलेल्या घोटाळ्यांचं काय झालं ते बघा, असा हल्लाबोल छगन भुजबळ यांनी किरीट सोमय्यांवर केला आहे.

    नांदेड : किरीट सोमय्या यांनी गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांवर अनेक गंभीर आरोप केले. त्यातच अनेक महत्त्वाच्या नेत्यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागला आहे. त्यातच सध्या नांदेड जिल्ह्यात देगलूर विधानसभा पोटनिवडणुकाचं वारं वाहू लागलं आहे.

    दरम्यान याप्रसंगी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी नांदेड येथे किरीट सोमय्यांवर टीकेची तोफ डागली. किरीट सोमय्या नांदेडला कशासाठी येत आहेत?, त्यांनी मुंबईला बसून आरोप करावे, असं म्हणत भाजपच्या नेत्यांनी केलेल्या घोटाळ्यांचं काय झालं ते बघा, असा हल्लाबोल छगन भुजबळ यांनी किरीट सोमय्यांवर केला आहे.

    तसेच अजित पवारांनी भाजप संबंधित असलेल्या कारखान्याची यादी दिली, तिकडे किरीट सोमय्यांनी जाण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे. त्याचबरोबर भाजपच्या घोटाळ्यांची त्यांनी भरसभेत यादीच वाचून दाखवली.

    तर भरसभेत छगन भुजबळ यांनी शायरीतुन टोला लगावल्याचं पाहायला मिळालं. “ये वक्त है बदल जाता है, आज तेरा वक्त है, कल मेरा आयेंगा, हम ना बदलेंगे वक्त के रफ्तार के साथ जब भी मिलेंगे रफ्तार वही होगी”, असं म्हणत भुजबळांनी यावेळी कार्यक्रमात किरीट सोमय्या आणि भाजपला चांगलंच फटकारल्याचं दिसून आलं.

    देगलूर येथील आयोजित सभेत बोलत असताना छगन भुजबळ म्हणाले, मला अडिच वर्षे मी बोलतो म्हणून तुरूंगात ठेवलं, पण आता मी गप्प राहणार नाही, महाविकास आघाडीच्या नेत्यांना विनाकारण त्रास दिला जात आहे. अशा कडक शब्दात त्यांनी भाजपला इशारा दिला आहे. यावर आता भाजपकडून काय प्रतिक्रीया येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.