नांदेडमध्ये तरुणाची सिनेस्टाइल हत्या, अंगावर काटा आणणारा घटनेचा थरार CCTV कॅमेऱ्यात कैद

मयत विशाल धुमाळ हा एका खासगी फायनास कंपनीत नोकरी करत होता. मोटारसायकलवर आलेल्या तीन अज्ञात मारेकऱ्यांनी रात्रीच्या वेळेस विशालला रस्त्यात थांबवलं. त्यानंतर त्याला बेदम मारहाण केल्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. शारदानगर भागात बुधवारी (५ जानेवारी) सायंकाळी ही घटना घडली. २२ वर्षीय रमेश धुमाळ हा दुचाकीवरून जात असतांना त्याला पाठीमागून दुसऱ्या दुचाकीवरून आलेल्या तीन जणांनी अडवलं. त्यानंतर आरोपींनी अचानक रमेश धुमाळ याच्यावर हल्ला केला. यावेळी आपले प्राण वाचवण्यासाठी रमेश तेथून पळू लागला. पण हल्लेखोरांनी त्याला पकडून धारदार शस्त्राने त्याला भोसकले.

    नांदेड : नांदेड शहरातील शारदा नगर भागात एका दुचाकीस्वाराचा पाठलाग करुन त्याची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. भररस्त्यात घडलेली ही थरारक घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. एका युवकाला अडवून तीन दुचाकीस्वारांनी तीक्ष्ण हत्याराने त्याच्यावर सपासप वार केले आणि निर्घृण हत्या केली.

    युवकाची चाकूने भोसकून हत्या झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. नांदेड शहरातील शारदानगर परिसरामध्ये रात्रीच्या वेळेस भर रस्त्यात हा प्रकार घडला. हा सगळा प्रकार तिथल्या एका दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे.

    मयत विशाल धुमाळ हा एका खासगी फायनास कंपनीत नोकरी करत होता. मोटारसायकलवर आलेल्या तीन अज्ञात मारेकऱ्यांनी रात्रीच्या वेळेस विशालला रस्त्यात थांबवलं. त्यानंतर त्याला बेदम मारहाण केल्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे.

    शारदानगर भागात बुधवारी (५ जानेवारी) सायंकाळी ही घटना घडली. २२ वर्षीय रमेश धुमाळ हा दुचाकीवरून जात असतांना त्याला पाठीमागून दुसऱ्या दुचाकीवरून आलेल्या तीन जणांनी अडवलं. त्यानंतर आरोपींनी अचानक रमेश धुमाळ याच्यावर हल्ला केला. यावेळी आपले प्राण वाचवण्यासाठी रमेश तेथून पळू लागला. पण हल्लेखोरांनी त्याला पकडून धारदार शस्त्राने त्याला भोसकले.

    तिघंही आरोपी एकाच बाईकवरुन ट्रिपल सीट आले होते. बेदम मारहाण केल्याने विशालचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती आहे. या प्रकरणी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस मारेकऱ्यांचा शोध घेत आहेत.