नांदेडमद्ये भाजपाला जबरदस्त झटका; तीन वेळा आमदार, तीन वेळा खासदार मंत्रीपद भूषवलेला आणि अशोक चव्हाणांचा जवळचा नातेवाईक काँग्रेसमध्ये प्रवेश करणार 

देगलूर- बिलोली मतदारसंघात भारतीय जनता पक्षाने शिवसेनेच्या सुभाष साबणे यांना उमेदवारी दिल्यानंतर २०१४ नंतर भाजपात गेलेल्या अन्य पक्षांतील आयारामांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा(Omprakash Pokarna ) यांच्यासह भारतीय जनता पक्षातील अनेक  पदाधिकाऱ्यांनी त्यामुळे  भाजपला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे निवडणुकांच्या प्रचारापूर्वीच भाजपला मोठे खिंडार पडल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

    नांदेड : देगलूर- बिलोली मतदारसंघात भारतीय जनता पक्षाने शिवसेनेच्या सुभाष साबणे यांना उमेदवारी दिल्यानंतर २०१४ नंतर भाजपात गेलेल्या अन्य पक्षांतील आयारामांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा(Omprakash Pokarna ) यांच्यासह भारतीय जनता पक्षातील अनेक  पदाधिकाऱ्यांनी त्यामुळे  भाजपला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे निवडणुकांच्या प्रचारापूर्वीच भाजपला मोठे खिंडार पडल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

    भाजपला रामराम करत काँग्रेस प्रवेशाची घोषणा

    माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे नातेवाईक असलेले भास्करराव पाटील खतगावकर हे नांदेड जिल्ह्यातील मातब्बर नेते म्हणून ओळखले जातात. ते तीन वेळा आमदार, तीन वेळा खासदार व राज्याचे मंत्री देखील राहिले आहेत. त्यांनी भाजपला रामराम करत काँग्रेस प्रवेशाची घोषणा केली आहे. त्यामुळे देगलूरच्या निवडणुकीत भाजपसाठी पक्षांतर्गत बंडाळीचे नवे आव्हान निर्माण झाले आहे. त्यातच शिवसेनेतून आयात केलेल्या साबणे यांच्या विरोधात शिवसेनेकडून निकराची झुंज दिली जाणार असल्याने भाजपसाठी ही निवडणूक सहजपणे जिंकण्याची शक्यता धुसर झाली आहे.

    मराठवाडयात पक्षाला अधिक बळकटी

    दरम्यान माजी मुख्यमंत्री आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री असौक चव्हाण यानी व्टिट करत म्हटले आहे की, मी भास्करराव खतगावकर आणि सर्व सहका-याचे कॉंग्रेस पक्षात घरवापसी बाबत स्वागत करतो. त्यांच्या  काँग्रेस प्रवेशामुळे नांदेड जिल्हाच नव्हे तर संपूर्ण मराठवाडयातील पक्ष संघटनेला अधिक बळकटी मिळेल, याचा मला विश्वास आहे.  त्यांनी म्हटले आहे की, माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर यांच्यासह काँग्रेस प्रवेशाची घोषणा करणारे माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा व त्यांच्या इतर सहकाऱ्यांचेही मी पक्षात स्वागत करतो. त्यांच्यामुळे काँग्रेस पक्ष अधिक मजबूत होईल.