देगलूर पोटनिवडणूकीत काँग्रेसचे जितेश अंतापूरकर 14175 मतांनी आघाडीवर

काँग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनानंतर देगलूरमध्ये पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीत एकूण 12 उमेदवार रिंगणात आहेत. असं असलं तरी 3 पक्षात प्रामुख्याने ही लढत होत आहे. या निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. कारण संपूर्ण महिनाभर मंत्री अशोक चव्हाण देगलूर बिलोलीमध्ये तळ ठोकून होते.

    नांदेड जिल्ह्यातील देगलूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीची आज मतमोजणी होत आहे. संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या या मतदार संघातील पोट निवडणुकीत कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली असून देगलूर येथील पहिल्या फेरीची मतमोजणी पूर्ण झाली आहे. देगलूरमध्ये १४ टेबलवर ३० फेऱ्यांची मतमोजणी होत आहे.

    आज सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. 14 टेबलवर 30 फेऱ्यांची ही मतमोजणी होईल. या निवडणुकीत 64.95 % इतकं मतदान झालंय. दुपारी 12 ते 1 च्या दरम्यान देगलूरचा पुढचा आमदार कोण, हे स्पष्ट होईल.

    काँग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनानंतर देगलूरमध्ये पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीत एकूण 12 उमेदवार रिंगणात आहेत. असं असलं तरी 3 पक्षात प्रामुख्याने ही लढत होत आहे. या निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. कारण संपूर्ण महिनाभर मंत्री अशोक चव्हाण देगलूर बिलोलीमध्ये तळ ठोकून होते. तर भाजपनेही ही निवडणूक प्रतिष्ठेची केली. भाजपचे अनेक नेते आमदार पदाधिकाऱ्यांनी संपूर्ण देगलूरमध्ये जीवाचं रान करुन प्रचार केला.

    देगलूरमध्ये पहिल्या फेरीअखेर काँग्रेसचे जितेश अंतापूरकर आघाडीवर आहेत. त्यांना ४२१६ मतं मिळाली आहेत. तर, भाजपाचे सुभाष साबणे २५९३ मतांसह दुसऱ्या क्रमांकावर असून वंचित बहुजन आघाडीचे डॉ. उत्तम इंगोले तिसऱ्या क्रमांकावर असून त्यांना ३२० मतं मिळाली आहेत. काँग्रेसचे जितेश अंतापूरकर १६२४ मतांनी आघाडीवर आहेत. दुसऱ्या फेरीच्या मतमोजणी अंती काँग्रेसचे जितेश अंतापूरकर ७२९४ मते मिळाली आहेत, तर भाजपाच्या सुभाष साबणे यांना ५००१ मतं मिळाली आहेत. दुसऱ्या फेरीअंती अंतापूरकर २२९३ मतांनी आघाडीवर आहेत. पाचव्या फेरीअखेर काँग्रेसचे जितेश अंतापूरकर १८२४७ मतांसह आघाडीवर आहेत. तर,भाजपाचे सुभाष साबणे १२०७७ मतांसह दुसऱ्या क्रमांकावर आहेत. जितेश अंतापूरकर सध्या ६१७० मतांनी आघाडीवर आहेत.