नांदेड जिल्हा भूकंपाने हादरला; मुदखेड तालुक्याजवळ केंद्र,  ३ रिश्टर स्केलचा धक्का

रात्री बारानंतर भूकंपाचा धक्का जाणवला. त्यात अनेक नागरिक झोपेत होते. मात्र, अचानक हादरा जाणवल्याने कित्तेकांनी घराबाहेर धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत नागरिक जागेच होते. यावेळी भूकंपाच्या चर्चेला उधाण आले. यापूर्वी १९९३ मध्ये किल्लारीत भूकंप झाला. त्या भूकंपाचे धक्के नांदेडपर्यंत जाणवले होते. त्यामुळे किल्लारी परिसरातल्या हजारो लोकांचा मृत्यू झाला. या आठवणी पुन्हा एकदा लोकांनी जागा केल्या.

    नांदेड – जिल्हा आज शनिवारी पुन्हा एकदा भूकंपाने हादरला. मुदखेड तालुक्याजवळ भूकंपाचे केंद्र असल्याचे समजते. या धक्क्याची ३ रिश्टर स्केल इतकी नोंद झालीय. या भूकंपामुळे कसलिही जीवित वा वित्तहानी झाल्याचे अजून तरी वृत्त नाही. नांदेड जिल्ह्यात यापूर्वीही भूकंपाचे अनेक धक्के बसलेत. मात्र, या धक्क्याने नागरिक पुन्हा धास्तावलेत. त्यांच्या भीतीचे वातावरणय.

    नांदेड जिल्ह्यात रात्री बारा वाजून एक मिनिटांनी भूकंपाचा धक्का जाणवला. या भूकंपाची तीव्रता तीन रिश्टर स्केल नोंदवली गेलीय. मुदखेड तालुक्यातील तिरकसवाडी, नागेली, शेंबोली या गावांच्या आसपास केंद्रबिंदू असल्याचे समजते. या धक्क्यामुळे कसलिही हानी झाल्याचे वृत्त अजून तरी नाही. मात्र, भूकंपाच्या कटू आठवणींनी नागरिकांची पाचावर धारण बसलीय.

    रात्री बारानंतर भूकंपाचा धक्का जाणवला. त्यात अनेक नागरिक झोपेत होते. मात्र, अचानक हादरा जाणवल्याने कित्तेकांनी घराबाहेर धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत नागरिक जागेच होते. यावेळी भूकंपाच्या चर्चेला उधाण आले. यापूर्वी १९९३ मध्ये किल्लारीत भूकंप झाला. त्या भूकंपाचे धक्के नांदेडपर्यंत जाणवले होते. त्यामुळे किल्लारी परिसरातल्या हजारो लोकांचा मृत्यू झाला. या आठवणी पुन्हा एकदा लोकांनी जागा केल्या.

    लातूर, हिंगोली जिल्ह्यातल्या अनेक गावात भूगर्भातून आवाज येतो. त्यामुळेही नागरिकांमध्ये भीतीय. लातूर जिल्ह्यातल्या निलंगा तालुक्यातल्या हासोरी गावात भूगर्भातून आवाज येतो. नागपूरच्या भूवैज्ञानिकांनीही या भागाची पाहणी केलीय. हे आवाज भूकंपाच्या सौम्य धक्क्यांनी येत असल्याचे त्यांनी सांगितलेय.