प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

वारंवार आवाहन करूनदेखीलही कामावर रुजू न झालेल्या कर्मचाऱ्यांवर एसटी महामंडळाने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. अनेक एसटी कर्मचाऱ्यांना एसटी महामंडळाने कारणे दाखवा नोटीस बजावण्यास सुरुवात केली आहे. नांदेडमध्ये कारणे दाखवा नोटीस मिळालेल्या एका कर्मचाऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केली असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संभाजी गुट्टे असे या एसटी कर्मचाऱ्याचे नाव आहे(Nanded: ST employee commits suicide; Show cause. Steps taken out of fear of notice).

  नांदेड : वारंवार आवाहन करूनदेखीलही कामावर रुजू न झालेल्या कर्मचाऱ्यांवर एसटी महामंडळाने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. अनेक एसटी कर्मचाऱ्यांना एसटी महामंडळाने कारणे दाखवा नोटीस बजावण्यास सुरुवात केली आहे. नांदेडमध्ये कारणे दाखवा नोटीस मिळालेल्या एका कर्मचाऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केली असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संभाजी गुट्टे असे या एसटी कर्मचाऱ्याचे नाव आहे(Nanded: ST employee commits suicide; Show cause. Steps taken out of fear of notice).

  नांदेड जिल्ह्यातील कंधार आगारातील वाहक संभाजी गुट्टे यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली. आगार प्रमुख एस. एम. ठाकूर यांनी दिलेल्या कारणे दाखवा नोटिसच्या भीती पोटी व आगार प्रमुखांच्या कामावर रुजू व्हावे यासाठी लावलेल्या तगाद्यामुळे त्यांनी विष प्राशन केले असल्याचे म्हटले जात आहे. एसटी वाहक संभाजी गुट्टे यांचा एक व्हिडिओदेखील व्हायरल झाला आहे.

  सदर कर्मचारी मी आगार प्रमुखांच्या दबावामुळे आत्महत्या करणार असल्याचे इशारा देत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्याशिवाय त्यांनी कंधार आगार प्रमुखांविरोधात केलेली तक्रार देखील सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

  एका महिन्याच चौघांची आत्महत्या

  नांदेड जिल्ह्यात एकाच महिन्यात चार एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या करून मृत्यूला कवटाळल्याने एसटी कर्मचाऱ्यांमध्ये शोक संतप्त भावना आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एसटी आंदोलन चिघळण्याची चिन्हं आहेत.

  हे सुद्धा वाचा
  • 2022