कपडे काढ, नाक घास, झाडू मार… नांदेड नर्सिंग कॉलेजमध्ये रॅगिंग, शिक्षकास अटक, 3 ‌विद्यार्थिनींवर गुन्हा दाखल

नांदेडमध्ये एका नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थींनीसोबत सिनियर्सनी रॅगिंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी पोलिसांनी एका शिक्षकास अटक कली तर तीन विद्यार्थिनींवर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर या कॉलेजमधील विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. हदगाव तालुक्यातील बनचिंचोली येथील गोविंदराव पाटील पऊळ नर्सिंग कॉलेजमध्ये दोन दिवसांपुर्वी हा प्रकार घडला.

    नांदेड : नांदेडमध्ये एका नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थींनीसोबत सिनियर्सनी रॅगिंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी पोलिसांनी एका शिक्षकास अटक कली तर तीन विद्यार्थिनींवर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर या कॉलेजमधील विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. हदगाव तालुक्यातील बनचिंचोली येथील गोविंदराव पाटील पऊळ नर्सिंग कॉलेजमध्ये दोन दिवसांपुर्वी हा प्रकार घडला.

    आठच दिवसांपुर्वी नर्सिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थीनीसोबत सिनियर्सनी कपडे काढ, नाक घास, झाडू मार अशा प्रकारची रॅगिंग घेतली होती. ग्रामीण भागातही रॅगिंगच्या घटना घडू लागल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

    पीडित मुलगी आठच दिवसांपूर्वी कॉलेजमध्ये दाखल झाली. ती महाविद्यालयाच्या वसतिगृहात राहते. वरिष्ठ वर्गात असलेल्या तीन मुली मंगळवारी पीडितेच्या खोलीत गेल्या व त्यांनी पीडितेला धमकावले. तसेच ‘कपडे काढ, नाक घास, झाडू मार…’ असे म्हणून तिला तसे करण्यास भाग पाडले. हे सांगण्यासाठी मुलगी शिक्षक भगीरथ शिंदे याच्याकडे गेली, तेव्हा त्यानेही तिचा विनयभंग करून, तिला धमकावल्याचा आरोप आहे.

    दरम्यान, मुलीने घडलेला प्रकार वडिलांना कळवला. दुसऱ्या दिवशी सकाळी तिचे वडील महाविद्यालयात आले आणि त्यांनी तिचा दाखला काढून घेतला. नंतर पोलिस ठाणे गाठून मुलीने मंगळवारी तक्रार दिली. पोलिसांनी भगीरथसह त्या तीन मुलींविरुद्ध गुन्हा नोंदवला व भगीरथला अटक केली. यापूर्वी बुधवारी सकाळी काही विद्यार्थिनींनी आरोपी मुलींची बाजू घेऊन पोलीस ठाणे गाठले. या प्रकरणात सरांचा दोष नाही, त्यांना सोडा, अशीही मागणी मुलींनी केली होती.