‘…तर विधानसभा निवडणूकीत भाजपच्या 144 आणि सेनेच्या 5 जागा निवडून आल्या असत्या’

आम्ही पंढरपूर जिंकून दाखवलं. तुम्हा तिघांच्या विरोधात ग्रामपंचायती जिंकल्या, साखर कारखाने जिंकले. कराडच्या कृष्णा कारखान्यात 21 पैकी 21 जागा आम्ही जिंकल्या. तुम्ही कितीही एकत्र आले तरी आम्ही देगलूरची जागा जिंकणारच. आम्ही हे राज्य विजयी केलं नव्हतं. मात्र, विधानसभेला सर्वाधित मतदान आम्हाला आहे.

    नांदेड : विधानसभा निवडणुकीत लोकांनी भाजपा आणि शिवसेना युतीला निवडून दिले होते. तेव्हा युती केली नसती तर एकट्या भाजपचे १४४ आमदार निवडून आले असते तर शिवसेना केवळ ५ जागांवर राहिली असती असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी लगावला. शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे यांनी आपल्या समर्थकांसह प्रदेशाध्यक्ष पाटील यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला याप्रसंगी ते बोलत होते.

    आम्ही पंढरपूर जिंकून दाखवलं. तुम्हा तिघांच्या विरोधात ग्रामपंचायती जिंकल्या, साखर कारखाने जिंकले. कराडच्या कृष्णा कारखान्यात 21 पैकी 21 जागा आम्ही जिंकल्या. तुम्ही कितीही एकत्र आले तरी आम्ही देगलूरची जागा जिंकणारच. आम्ही हे राज्य विजयी केलं नव्हतं. मात्र, विधानसभेला सर्वाधित मतदान आम्हाला आहे. आम्हाला 20 आमदार कमी पडले आणि आम्हाला सर्व ठिकाणी धोका झाला. आम्ही धोका दिला असता तर शिवसेनेच्या पाच जागाही आल्या नसत्या, अशा शब्दात पाटील यांनी शिवसेनेला पुन्हा एकदा डिवचलं आहे.

    ‘मागच्या निवडणुकीत सर्वात जास्त मते भाजपाने घेतली होती. 124 जागा लढवून सुद्धा आमचे 105 आमदार आले. अपक्ष आमदार सुद्धा आमच्या संपर्कात होते. पण उद्धव ठाकरे यांचं सरकार येणार असल्याचे समजल्याने ते आमदार तिकडे गेले, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.